ब्ल्यू व्हेल गेमच्या वेडापायी, अंधेरीतील शेर-ए-पंजाब कॉलनीमध्ये राहणाऱ्या 14 वर्षाच्या मनप्रीत सहानने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ब्लू व्हेल गेमचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. "सरकारने पुढाकार घेऊन, वेळ पडली तर केंद्र सरकारशी संपर्क साधण्याची गरज आहे. आपलं वजन वापरुन देशपातळीवरच ब्लू व्हेल गेम पूर्णपणे बंद करणं आवश्यक आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे," असं अजित पवार म्हणाले.
यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "हा गंभीर विषय आहे, त्याची चौकशी सुरु आहे. या संदर्भातील आवश्यक सगळी माहिती घेतली जाईल. हा इंटरनेट बेस गेम असल्याने, त्याचं सर्व्हर आपण होस्ट करत नाही, तो बाहेरुन आहे. त्यामुळे तो कसा थांबवता येईल, याबाबत केंद्र सरकारशी बोलून कारवाई केली जाईल."
काय आहे ‘ब्ल्यू व्हेल’ गेम?
ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये एक ‘मास्टर’ मिळतो मास्टर प्लेअरला कठीण टास्क देतो. स्वत:च्या रक्ताने ब्ल्यू व्हेल तयार करणं, शरीरावर जखमा करणे, दिवसभर हॉरर फिल्म पाहणे, रात्रभर जागणे अशा प्रकारचे टास्क मिळाल्यामुळं खेळणारे नैराश्याच्या गर्तेत जातात अशा प्रकारे मास्टर प्लेअरवर 50 दिवस कंट्रोल ठेवतो. खेळाचा शेवटचा टप्पा म्हणजे प्लेअरला आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं आणि स्वतःची हिंमत सिद्ध करण्यासाठी अनेक प्लेअर आत्महत्या करतात.
संबंधित बातम्या
‘ब्लू व्हेल’ गेमच्या नादापायी मुंबईतील 14 वर्षीय मुलाची आत्महत्या