मुंबई: राज्य सरकारने बोंडअळी आणि तुडतुडे रोगाने पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 3 हजार 400 कोटींची मदत जाहीर केली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात बोंडअळी आणि तुडतुडे रोगाने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे.

शेतकऱ्यांन 3 हजार 400 कोटींची देण्याबाबातचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. तीन समान हप्त्यात ही मदत शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कापसाला बोंड अळी लागल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यातच विषारी किटक नाशक फवारणीमुळे सुमारे 30 पेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाला होता.

दुसरीकडे धान पिकाला तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विदर्भातील शेतक-यांना मोठा फटका बसला होता. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत, नुकसान भरपाईची मागणी केली होती.

कापूस किंवा धानाचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.