एक्स्प्लोर

म्हाडाचं घरं आता मोठं, क्षेत्रफळातील विसंगती अखेर दूर

मुंबई : म्हाडाच्या 'प्रधानमंत्री आवास योजने'अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळातील विसंगती राज्य सरकारने अखेर दूर केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरांच्या क्षेत्रफळातील विसंगती दूर करण्याबाबत राज्य सरकार विचार करत होतं.   सुधारित क्षेत्रफळ:  
  • अत्यल्प उत्पन्न गट- 300 चौरस फुटांपर्यंत - ऐवजी - आता 30 चौ. मी.पर्यंत
  • अल्प उत्पन्न गट - 475 चौर फुटांपर्यंत - ऐवजी - आता 30 चौ.मी. पेक्षा जास्त व 60 चौ. मी.पर्यंत
  • मध्यम उत्पन्न गट - 650 चौ. फुटांपर्यंत - ऐवजी - आता 60 चौ.मी.पेक्षा जास्त व 80 चौ.मी.पर्यंत
  • उच्च उत्पन्न गट - 1076 चौ.फुटांपर्यंत - ऐवजी - आता 80 चौ.मी.पेक्षा जास्त व 100 चौ.मी.पर्यंत
  म्हणजेच उच्च उत्पन्न गट सोडल्यास अल्प, अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटांच्या घरांचं क्षेत्रफळ वाढवलं आहे. अर्थात क्षेत्रफळांनुसार किंमतीतही वाढ असणार आहे. मात्र, जास्त आकाराचं रुम मिळणार असल्याने नागरिकांना ही एकप्रकारे खुशखबरच ठरणार आहे.   मुंबईतील म्हाडाच्या 970 घरांना आणखी विलंब?   म्हाडाच्या मुंबईतील 970 घरांची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आणखी वाट पाहायला लागण्याची शक्यता आहे. कारण नव्याने आर्थिक उत्पन्न गटाचे निकष जाहीर झाले आहेत. त्यामुळे हे निकष यंदाच्या सोडतीसाठी लागू होणार की नाही, याबाबतचा निर्णय अजून झाला नाही. त्यामुळे म्हाडाच्या मुंबईतील 970 घरांच्या सोडतीबाबत अद्यापही संभ्रम आहे.   मात्र, घरांच्या क्षेत्रफळाबाबत राज्य सरकारने शुद्धीपत्रक जाहीर केलं आहे. त्यामुळे म्हाडा आता सुधारित क्षेत्रफळाच्या शुद्धीपत्रकानंतर 970 घरांची सोडत जाहीर करणार, की उत्पन्न गटांच्या मर्यादांच्या निकषांवरील निर्णयाची वाट पाहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget