मुंबई : कोरोना लस वाटपात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय झाल्याचं चित्र आहे. केंद्राच्या कोविड लस वाटपात महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा कमी डोस आले आहेत. आज केंद्राने केलेल्या लसीचा वाटपात महाराष्ट्राला 17 लाख 40 हजार डोस देण्यात आले आहेत. तर भाजपचं सरकार असलेल्या राज्यांना जास्त डोस दिल्याचं उघड झालं आहे.


महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल (7 एप्रिल) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसंच केंद्राने लवकरात लवकर लसीचा पुरवठा करावा, अन्यथा लसीकरण अभियान थांबेल, असंही म्हटलं.


दररोज सहा लाख लसीकरण हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राला दर आठवड्याला 40 लाख डोसची आवश्यकता आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. तरीही कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असूनही केंद्राने आज महाराष्ट्राला फक्त 17 लाख 40 हजार डोसचं वाटप केलं आहे.


भाजपशासित राज्यांना जास्तीचा लस साठा
तर भाजप सरकार असलेल्या राज्यांना जास्तीचा लस साठा देण्यात आल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशला 44 लाख डोस, मध्य प्रदेशला 33 लाख डोस, गुजरातला 16 लाख लस, 
कर्नाटक 23 लाख डोस, हरियाणा 24 लाख डोस, झारखंड 20 लाख डोस केंद्राने दिले आहेत.


दरम्यान, या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. 


संबंधित बातम्या


केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक, लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांच्या तुलनेत गुजरातला जास्त लस पुरवठा


CoronaVaccine | कोरोनाच्या लस वाटपात राजकारण होतंय का?


Maharashtra Corona Vaccination: कोरोना लसीकरणावरुन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप


लसीकरणावरुन हर्ष वर्धन यांचे महाराष्ट्रावर गंभीर आरोप; सत्यजीत तांबेंची टीका तर सुप्रिया सुळेंकडून लसीकरण परिस्थितीचा दाखला