Maharashtra Police Recruitment: राज्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना (Maharashtra Police Recruitment 2022) राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढवण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यासाठीची मागणी करण्यात येत होती. पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांना आता 15 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज भरता येणार आहे. 


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलीस भरती बाबत आमच्याकडे 11 लाख 80 लाख अर्ज आले आहेत. पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढवण्यात आली असल्याचा निर्णय झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. 






जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. मात्र, संबंधित वेबसाईट वारंवार हँग होत असल्याने इच्छुकांना अर्ज भरताना अनेक अडचणी जाणवत होत्या. राज्यातील काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी बराच तास लागत होता.  अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप रजिस्ट्रेशन झाले नसून काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली असल्याची तक्रार करण्यात येत होती. 


बऱ्याच महिन्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेऊन भरतीची तयारी केली केली आणि आता याच भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेवसाईट सातत्याने हँग होत असल्याने ग्रामीण भागात  विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी लागत होती. अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढत होती. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती. 


इतर महत्त्वाची बातमी: