Ambadas Danve On State Govt : शेतकऱ्यांना (Farmers) पीकं वाचवण्यासाठी सध्या विजेची गरज आहे. पण जबरदस्तीनं शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. त्यामुळेचं काल पोपट जाधव या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचे दानवे म्हणाले. हे सरकार शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत आहे. शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा (Crop Insurance) मिळत नाहीत. विमा कंपन्या शेतकऱ्यांचा टाळूवरचं लोणी खात असल्याचे दानवे म्हणाले. त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा अंबादास दानवेंनी यावेळी दिला. दानवेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
सरकारचे सर्वसामान्यांकडे लक्ष नाही
अंबादास दावनेंवी विविध मुद्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत असल्याचा आरोप यावेळी दानवेंनी केला. सध्या शेतीसाठी शेतकऱ्यांनी विजेची गरज आहे. अशा स्थितीत जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी सुरु असल्याचे दानवे म्हणाले. गोवरचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारकडून कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय केले जाात नाहीत. सरकारच्या निष्काळीपणामुळं लहान मुलांचे मृत्यू होत असल्याचे दानवे म्हणाले. सर्वसामान्यांकडे या सरकारचे लक्ष नाही. कोणी देवीला जातय, तर कोणी प्रचाराला असा टोलाही दानवेंनी यावेळी शिंदे गटाला लगावला.
मनसेच्या फक्त घोषणा, बाकी काही नाही
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेच्या संदर्भात देखील दानवेंना प्रसारमाध्यमांनी विचारले. यावेळी दानवे म्हणाले की, मनसे फक्त घोषणा करते, बाकी काही करत नाही. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी केंद्र सरकारशी चर्चा करुन प्रश्न सोडवायला हवा. आपला भाग महाराष्ट्रात आणायला हवा असेही दानवे म्हणाले. मराठी माणूस आणि शिवसेना घुसखोरांना त्यांच्याच कृतीतून उत्तर देईल असा इशाराही दानवेंनी यावेळी दिला.
संजय राऊतांच्या सुरक्षिततेच काम सरकारनं पाहावं
कर्नाटकमध्ये बोलावून मला अटक करण्याचा तसेच माझ्या घातपाताचा कट असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. याबाबत देखील अंबादास दानवेंना विचारण्यात आलं. यावेळी दानवे म्हणाले की, संजय राऊत हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी जी भुमिका मांडली होती ती राज्यासाठी मांडली होती. त्यांच्या सुरक्षिततेचं काम सरकारनं पाहायला हवं असे दानवे यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Nanded: नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी; धक्कादायक आरोप