Maharashtra Police Bharti: नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती (Police) प्रक्रियेसाठी शासनाच्या ज्या साईटवर उमेदवारांना अर्ज भरायचे आहेत ती साईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. बऱ्याच दिवसानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेऊन भरतीची तयारी केली असली तरी आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी साईट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी लागत आहे.
अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप रजिस्ट्रेशन झाले नसून काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आता पोलीस भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी सरकारकडे आहेत. पोलीस भरतीचे ऑनलाइन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना साईट चालत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.
नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या ज्या साईटवर उमेदवारांना अर्ज भरायचे आहेत ती साईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय.
बऱ्याच दिवसानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेऊन भरतीची तयारी केली केली आणि आता याच भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी साईट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी लागतेय.
बीडपासून 15 किलोमीटर असलेल्या नारायण गडवरून सोहेल शेख हा रात्रीच्या वेळी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आला होता. मात्र दिवस उजाडला तरी त्याचा अर्ज सबमिटच झाला नाही. सातत्याने साईट बंद चालू होत असल्याने सोहेल सारख्या विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेमध्ये बसून रात्र जागून काढावी लागत आहे.
साईट व्यवस्थित चालत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप रजिस्ट्रेशनही झाले नाही. तर काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकल्याने अर्ज सबमिट होत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आता पोलीस भरतीची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी करत आहेत.
नऊ नोव्हेंबर पासून पोलीस भरती करणारे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरत आहेत. याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर असून आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी फक्त चार दिवसांचा अवधी बाकी आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या या साईटमध्ये जर बदल नाही झाला तर अनेक विद्यार्थी आपला अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी तारीख वाढवून देण्याची मागणी करत आहेत.
ही बातमी देखील वाचा
Nagpur Police Recruitment : कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी भरता येईल अर्ज, उमेदवारांमध्ये असंतोष