एक्स्प्लोर

कॅरमपटू जान्हवी मोरे ही सरकारी अनास्थेचा बळी, मनसेचा आरोप

महाराष्ट्राची उदयोन्मुख कॅरमपटू जान्हवी मोरे हिचा रविवारी डोंबिवलीतील पलावा जंक्शनजवळ अपघाती मृत्यू झाला. तिचा मृत्यू हा सरकारी अनास्थेचा बळी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

डोंबिवली : महाराष्ट्राची उदयोन्मुख कॅरमपटू जान्हवी मोरे हिचा रविवारी डोंबिवलीतील पलावा जंक्शनजवळ अपघाती मृत्यू झाला. तिचा मृत्यू हा सरकारी अनास्थेचा बळी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. तर स्थानिकांनीही या जंक्शनवरील वाहतुकीच्या बोजवाऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणाची दखल घेणे गरजेचे झाले आहे. जान्हवी मोरेचा रविवारी डोंबिवलीच्या पलावा जंक्शनजवळ टँकरखाली चिरडून मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या टँकरचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. परंतु या मृत्यूला या भागातला वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवाराच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. ज्या पलावा जंक्शनला जान्हवीचा अपघात झाला, तिथे वाहतुकीचे कोणतेही नियम पाळले जात नसून सर्वसामान्य वाहनचालक, पादचारी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याची बाब समोर आली आहे. जान्हवीचा अपघात हा रस्ता ओलांडताना झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्याठिकाणी रस्त्यावरील दुभाजक काढण्यात आले आहेत. त्यामुळे तिथे सिग्नल किंवा वाहतूक पोलीस असणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत एबीपी माझाने वाहतूक पोलिसांना विचारले असता त्यांनी सांगितले की, इथे कायम वाहतूक पोलीस तैनात असतात. जान्हवीच्या अपघाताला वाहतूक पोलीस जबाबदार नाहीत. परंतु स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर स्थानिकांनी सांगितले की, वाहतूक पोलीस अनेकदा जंक्शनजवळ नसतात, अशा वेळी अपघात होतात. या घटनेवरुन मनसेने सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पलावा सर्कलवर अनेक वर्षांपासून वाहतुकीची समस्या असून त्यामुळेच इथे उड्डाणपूल उभारण्यात येणार होता. त्याचे भूमिपूजनही झाले, परंतु पुढे काहीच झाले नाही, असा आरोप मनसेचे नेते राजू पाटील यांनी केला आहे. तसेच जान्हवी मोरे हा सरकारी अनास्थेचा बळी असल्याचे मतही पाटील यांनी व्यक्त केले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
देशातील पहिला 'पाण्याचा सातबारा' महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट  
देशातील पहिला 'पाण्याचा सातबारा' महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
मी राजीनामा देणार नाही, सुनेत्रा पवारांचे ओएसडी आले होते, पण..; इद्रीस नायकवाडींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
मी राजीनामा देणार नाही, सुनेत्रा पवारांचे ओएसडी आले होते, पण..; इद्रीस नायकवाडींनी सांगितलं नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
IPL 2026 : ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट? आकडेवारी काय सांगते?
ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट?
Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
RCB vs GT Qualifier 1: पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, जाणून घ्या IPL चा नियम 
पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, राखीव दिवस आहे का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
Embed widget