मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलवरील विक्रीकर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्यानं कमी केला होता. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी थोडेसे कमी झाले होते. मुंबईकरांना हा दिलासा मिळत असतानाच सीएनजी (CNG Rates Hike) आणि पीएनजीच्या (PNG Rate) दराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसापाठोपाठ मुंबईकरांना वाढत्या महागाईचाही फटका बसणार आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडनं (MGL) घेतला आहे.
सीएनजी आणि पीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळं मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडनं मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. त्यानुसार सीएनजीच्या दरात किलोमागे दीड रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळं सीएनजीची किंमत ७५ रुपये प्रति किलोवर जाईल. तसंच घरगुती पीएनजीच्या किमतीत प्रति एससीएम एका रुपयानं वाढ होणार आहे. त्यामुळं घरगुती पीएनजीची किंमत प्रति एससीएम ४८ रुपयांवर जाईल.
सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ होण्याचं कारण?
मुंबईकरांना आता महागाईचा सामना करावा लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडनं मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यामागं नेमकं कोणतं कारण आहे ते देखील सांगितलं आहे. उत्पादन खर्चात वाढ होत असल्यानं त्याच्या तुलनेत दरवाढ करण्यात आली आहे. मुंबईत सीएनजी आणि पीएनजीचे दर आज मध्यरात्रीपासून लागू केले जातील, अशी माहिती देखील महानगर गॅस लिमिटेडकडून देण्यात आली आहे.
मुंबईत सीएनजी, पीएनजीचे दर वाढले
मुंबईत सीएनजी १.५० रु. प्रति किलोनं महाग झाला आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. मुंबईतील अनेक रिक्षा आणि चार चाकी वाहनं सीएनजीवर चालवली जातात त्यामुळं सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानं प्रवास महागणार का हे देखील पाहावं लागेल.
राज्य सरकारनं नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात विक्रीकर कमी करत मुंबई करांना डिझेल आणि पेट्रोलच्या दरात नाममात्र कपात करत दिलासा दिला होता. यानंतर काही दिवसातचं त्यांना सीएनजी दरवाढीचा सामना करावा लागत आहे.
संबंधित बातम्या :
Mumbai News : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे रुळांवर पाणी, कुठे वाहतूक कोंडी तर कुठे झाडं पडली