Mumbai News : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे रुळांवर पाणी, कुठे वाहतूक कोंडी तर कुठे झाडं पडली
मुंबईत मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावली. शहरातील काही भागांमध्ये 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यामुळं मुंबईत काही ठिकाणी पाणी साचलं होतं. तर, रस्त्यांवर पाणी देखील साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुसळधार पावसामुळं दादर पूर्वमध्ये स्वामीनारायण मंदिराजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.
मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक देखील मंदावली होती. वांद्रेहून बोरिवलीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक मंदावली होती.
पश्चिम उपनगरात साडे आठच्या दरम्यान दोन तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालाड सबवे पाणी खाली गेला होता. मालाड सबवेत मध्ये पाणी भरल्यामुळे मलाड सबवे पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता..
मुंबई एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असताना काळाचौकी अभ्युदय नगर पटांगणातील साठ वर्षापेक्षा अधिक जुनं वडाचे झाड आज मुळासकट उखडून पडलं, या घटनेत जीवितहानी झालेली नाही.
अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळालं.
मुंबई लोकलच्या अनेक स्थानकांमध्ये रुळांवर पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळालं. यामुळं उनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता.