एक्स्प्लोर

अजॉय मेहता यांच्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी?

ठाकरे सरकारवर एकामागोमाग एक संकट येतंय, कधी कोरोनाचं कधी चक्रीवादळाचं तर कधी अंतर्गत धुसफुशीचं. ठाकरे सरकारमध्ये सध्या राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याविरोधात प्रचंड नाराजी आहे. मंत्री आणि सचिवांमध्ये खटके उडू लागले आहे. एकीकडे त्यांचा संपलेला कार्यकाळ वाढवण्यावर स्वत: मुख्यमंत्री आग्रही आहेत तर दुसरीकडे मेहतांविरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मोर्चबांधणी केली आहे.

मुंबई : एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातलेलं असताना राज्यात सचिव विरुद्ध मंत्री असा वाद रंगला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजॉय मेहता यांच्यावर मेहरबान असले तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मेहता नकोत. मुख्यमंत्र्यांनी याआधीच तिसर्‍यांदा मेहतांना कार्यकाळ वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारला पत्रं पाठवलं आहे. अजॉय मेहता यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कनेक्शन पाहता, तिसरी टर्म पदरात पाडून घेतील असे संकेत आहेत. पण त्याआधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेहतांविरोधात मोर्चेबांधणी केली आहे आणि याचाच प्रत्यय मागच्या कॅबिनेटमध्ये आला.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या खात्याचा प्रस्ताव सचिवांनी मंत्र्यांना विश्वासात न घेतल्याने सादर केल्याने खंडाजंगी झाली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरु आहेत त्यामुळे अजॉय मेहता यांच्याविरोधात वातावरण तयार झालं आहे.

कोण आहेत अजॉय मेहता?

- राज्याच्या प्रशासनात सध्या सर्वात ज्येष्ठ असलेले अजॉय मेहता हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

- ते सप्टेंबर 2019 मध्ये सेवेतून निवृत्त झाले.

- मात्र तोंडावर आलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली.

- निवडणुकांनंतर सर्व समीकरणं बदलली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

- कोरोनाच्या संकटात लढताना उद्धव ठाकरेंच्या काळात अजॉय मेहतांना दुसरी टर्म मिळाली, ही टर्म येत्या 30 जून रोज संपतेय.

- पण तिसऱ्या टर्मसाठीच उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र पाठवलं आहे.

- अजॉय मेहता यांना तिसर्‍यांदा मुदतवाढ मिळाल्यास निवृत्तीनंतर सलग एक वर्ष मुख्य सचिव राहण्याचा रेकॉर्ड होईल.

तुकाराम मुंढे आणि अजॉय मेहता यांच्या बदलीसाठी काँग्रेस नेते आग्रही, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

सचिव विरुद्ध मंत्री वाद राज्यासाठी योग्य नाही! सचिव विरुद्ध मंत्री हा वाद राज्याच्या हिताचा नाही. याआधी अजॉय मेहतांमुळे एकाच दिवस तीन वेळा निर्णय बदलण्याची नामुष्की सरकारवर आली होती. प्रविण परदेशी आणि अजॉय मेहता यांच्यामधला विस्तव विझत नव्हता, अखेर मेहतांनीच परदेशींचा काट काढल्याची चर्चा सुरु होती. त्यात उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या जवळचे असल्याने, इतर मंत्र्यांना विश्वासात न घेता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देणे अशा अनेक कारणांवरुन अजॉय मेहता नेहमीच चर्चेत राहिले. त्यामुळे अजॉय मेहता यांच्याबद्दलचा विरोध अधिक वाढत गेला.

मेहतांमुळे आयएएस लॉबीही नाराज? अजॉय मेहतांमुळे नुसतेच नेते मंडळी नाही तर IAS लॉबीदेखील मोठ्या प्रमाणात नाराज आहे. कारण ठाकरेंच्या मेहता प्रेमामुळे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. संजय कुमार हे अजॉय मेहता यांच्याच 1984 च्या बॅचचे अधिकारी आहेत. मूळचे बिहारी असलेले संजय कुमार हे देखील अनुभवी आहेत. पण त्यांना मागील नऊ महिन्यांत मुख्य सचिव होण्याची संधी मिळाली नसल्याने त्यांच्यासारखे अनेक जण नाराज आहेत. त्यामुळे आता पुढे काय होतं यावर मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची नजर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
Maharashtra Goverment Cabinet Decision: शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा, एसटीच्या अतिरिक्त जागेबाबत मोठा निर्णय; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा, एसटीच्या अतिरिक्त जागेबाबत मोठा निर्णय; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Embed widget