एक्स्प्लोर

TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर

TET Exam Paper Leak: छापखान्यातून अवघ्या ८ हजार रुपयांत बाहेर पडलेली प्रश्नपत्रिका मुख्य सूत्रधार बीजेंद्र कुमार गुप्ता याने आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून तब्बल ८० हजार रुपयांना विकल्याचे तपासात समोर आले.

भिवंडी: देशभरात सध्या 'नीट' (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच, आता महाराष्ट्रातील ६ लाखांपेक्षा जास्त भावी शिक्षकांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या 'शिक्षक पात्रता परीक्षा' (TET) पेपरफुटीबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका छापखान्यातून अवघ्या ८ हजार रुपयांमध्ये बाहेर काढलेला प्रश्नपत्रिकेचा संच दलालांच्या जाळ्यातून फिरत-फिरत जेव्हा भिवंडीत पोहोचला, तेव्हा त्याची किंमत तब्बल 80 हजार रुपयांवर गेल्याचा खळबळजनक खुलासा पोलीस तपासात झाला आहे.

TET Exam Paper Leak: असा झाला लाखोंच्या स्वप्नांचा बाजार

शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या टीईटी पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश भिवंडी पोलिसांनी केला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित छापखान्यातील कर्मचारी नरेशकुमार याने हा अत्यंत गोपनीय पेपर मुख्य फरार आरोपी बिजेंद्र गुप्ताचा साथीदार सोनू याला अवघ्या ८ हजार रुपयांत विकला होता. यानंतर बिजेंद्र गुप्ताने आपल्या विविध राज्यांमधील एजंट्स आणि दलालांच्या साखळीचा वापर करून हा पेपर सुरुवातीला ८० हजार रुपयांना विकला. पुढे जसा जसा हा पेपर प्रत्येक टप्प्यावरील दलालांकडे गेला, तसा तसा त्यांनी स्वतःचा मोठा नफा त्यात जोडला. भिवंडीतील ग्राहकांपर्यंत हा पेपर पोहोचेपर्यंत त्याची किंमत तब्बल १.५ कोटी रुपयांवर गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून प्रश्नपत्रिकेची मूळ प्रत हस्तगत करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य मास्टरमाईंड बिहारचा रहिवासी बिजेंद्र गुप्ता हा असून तो सध्या फरार आहे.

TET Exam Paper Leak: मास्टरमाईंडची हायटेक कार्यपद्धती

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार आरोपी बिजेंद्र गुप्ता हा अत्यंत शातिर आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करत असे. देशभरातील विविध राज्यांच्या गोपनीय प्रश्नपत्रिका ज्या छापखान्यांमध्ये (Printing Press) छापल्या जातात, अशा ठिकाणांची तो आधी माहिती काढायचा. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना पैशांचे मोठे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढायचा. कोणत्याही राज्याची प्रश्नपत्रिका छापायला आली की, ती कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोरून संबंधित राज्यातील एजंटांमार्फत लाखो रुपयांना विकली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

TET Exam Paper Leak: सुरक्षा यंत्रणेला ठेंगा दाखवत छपाई कर्मचाऱ्यानेच चोरला पेपर

२८ जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तर प्रदेशातील आग्रा येथील 'महीम पत्रम प्रायव्हेट लिमिटेड' या छापखान्यात छपाईसाठी पाठवण्यात आली होती. तिथे सुरक्षेची चोख व्यवस्था असतानाही, तिथला कर्मचारी नरेशकुमार मौहर ऊर्फ निकी याने सुरक्षा यंत्रणेतील पळवाटा शोधून प्रश्नपत्रिका बाहेर काढली. सूत्रांच्या माहितीनुसार, छापखान्यातून बाहेर पडताना केवळ कपड्यांची वरवर झडती घेतली जात असल्याचे नरेशकुमारने हेरले होते. टीईटीच्या पेपर-१ आणि पेपर-२ चे प्रत्येकी दोन संच छापले जात असल्यामुळे परीक्षेच्या दिवशी कोणताही एक संच निवडण्याचा नियम होता. याचाच गैरफायदा घेत नरेशकुमारने सलग तीन दिवस सुरक्षेला चकवा देऊन चारही संच छापखान्याबाहेर काढले आणि ते मुख्य आरोपीच्या साथीदाराला आणून दिले.

TET-2026 परीक्षेसाठी राज्यभरातील सुमारे सहा लाख उमेदवार आणि १,०२८ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्यासाठी परीक्षा परिषदेने राज्याबाहेरील आग्रा येथील अत्यंत गोपनीय 'महीम पत्रन प्रायव्हेट लिमिटेड' या छापखान्यात छपाईची जबाबदारी दिली होती. छापखान्याभोवती कडेकोट सुरक्षा, माजी सैनिकांचा पहारा आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची अंगझडती घेतली जात होती. मात्र, सुरक्षेतील एक छोटीशी चूक संपूर्ण व्यवस्थेवर भारी पडली.

TET Exam Paper Leak: बुटाच्या इनसोलमध्ये लपवून बाहेर काढले चारही सेट

१५ ते १७ जूनदरम्यान छपाई सुरू असताना प्रेसमधील कर्मचारी नरेशकुमार पुरनचंद माहौर उर्फ निक्की याने प्रश्नपत्रिकेची पाने घडी करून ती बुटाच्या इनसोलखाली लपवली. सुरक्षा रक्षकांनी शरीराची तपासणी केली, पण बुटांची नाही. याचाच फायदा घेत त्याने सलग तीन दिवस पेपर-१ आणि पेपर-२ चे चारही संच छापखान्याबाहेर काढले. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी कोणताही संच निवडण्याची परीक्षा परिषदेची योजना पूर्णपणे फसली.

TET Exam Paper Leak: ८ हजारांत बाहेर पडलेला पेपर ८० हजारांत विकला गेला

छापखान्यातून अवघ्या ८ हजार रुपयांत बाहेर पडलेली प्रश्नपत्रिका मुख्य सूत्रधार बीजेंद्र कुमार गुप्ता याने आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून तब्बल ८० हजार रुपयांना विकल्याचे तपासात समोर आले . त्यानंतर विविध एजंटांनी त्यावर स्वतःचे कमिशन जोडत किंमत आणखी वाढवली. विशेष म्हणजे, ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली नव्हती. संपूर्ण व्यवहार हार्ड कॉपीच्या माध्यमातून करण्यात आला.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फरार असलेला मुख्य सूत्रधार बीजेंद्र कुमार गुप्ता हा एखाद्या विशिष्ट परीक्षेला लक्ष्य करत नव्हता. त्याऐवजी विविध राज्यांच्या प्रश्नपत्रिका जिथे छापल्या जातात, त्या गुप्त छापखान्यांतील कर्मचाऱ्यांना पैशांचे आणि इतर आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत होता. छपाईसाठी कोणतीही प्रश्नपत्रिका आली की ती बाहेर काढून आपल्या कोचिंग नेटवर्कमार्फत विकण्याचा त्याचा पॅटर्न होता.

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली. ज्या छापखान्यात राज्यातील सर्वात गोपनीय प्रश्नपत्रिका छापल्या जात होत्या, तेथील सीसीटीव्ही कॅमेरेच बंद होते. त्यामुळे आरोपींची कोणतीही हालचाल रेकॉर्ड झाली नाही.

TET Exam Paper Leak: भिवंडीतून मिळाली पहिली टिप... आणि उलगडला संपूर्ण कट

२८ जून रोजी होणाऱ्या TET परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे २६ जून रोजी भिवंडी पोलिसांना पेपरफुटीची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली डमी ग्राहक पाठवून सापळा रचण्यात आला. शिक्षण विभागाकडून प्रश्नपत्रिका मूळ असल्याची खात्री होताच कारवाई करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले. बिहार, हरियाणा, दिल्ली आणि आग्रा येथे कारवाया करत या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.

आतापर्यंत १२ आरोपी जेरबंद
२८ जून :
धीरज बलराज सिंह (हरियाणा)
राजीव शाव (बिहार)
आकाशकुमार सरोजकुमार (बिहार)
२९ जून :
सुमन कुमारी (विजेंद्र गुप्ताची पत्नी, पटना)
२ जुलै :
सोनूकुमार सिंह
मिथुनकुमार सिंह (दोघे समस्तीपूर, बिहार)
कपिल कृष्णा दहिया (सोनीपत, हरियाणा)
४ जुलै :
संजयकुमार सुरेशचंद्र शर्मा
बाबुलाल नारायणसिंह कुशवाह
नरेशकुमार पुरनचंद माहौर उर्फ निक्की (तिघेही आग्रा)
९ जुलै :
नरेशकुमार पवनकुमार अशोककुमार यादव (नवी दिल्ली)
हरिओम रिचपालसिंह पानू (हिस्सार, हरियाणा)

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget