Monalisa Want to Become an Actress : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा 2025 सुरु असल्यामुळे येथे अध्यात्मिक वातावरण पाहायला मिळत आहे. या कुंभमेळ्यात तेथील साधू-संतांचे फोटो चर्चेत येत आहेत. काही दिवसांपूर्वी आयआयटी साधू आणि सुंदर साध्वी चर्चेत आली होती. त्यासोबतच एका सुंदर तरुणीची चर्चाही रंगली आहे.  महाकुंभ मेळ्यातील सावळा रंग आणि सोनेरी डोळे असणारी सुंदर तरुणी सध्या प्रसिद्धीझोतात आहे. कुंभ मेळ्यात रुद्राक्षांच्या माळआ विकण्यासाठी पोहोचलेली तरुणी तिच्या सुंदरतेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली.


महाकुंभ मेळ्यातील सुंदरीची सर्वत्र चर्चा


इंदूरहून प्रयागराज महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी पोहोचलेली तरुणी मोनालिसा सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. सावळा रंग आणि सोनेरी डोळे असणाऱ्या मोनालिसाचा चेहरा पाहताच नेटकऱ्यांनी तिला स्वर्गातून अवतरलेल्या अप्सरेची उपमा दिली आहे. मोनालिसा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे, तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या मोनालिसाने अभिनेत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री होण्याची मोनालिसाची इच्छा


सोशल मीडियावर व्हायरल गर्ल मोनालिसाच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मोनालिसा बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. व्हिडीओमध्ये पत्रकार मोनालिसाला विचारतो की, तुझी आवडती अभिनेत्री कोणती यावर उत्तर देताना तिने विश्वसुंदरी ऐश्वर्या रायचं नाव घेतलं. मोनालिसाने सांगितलं की, तिला ऐश्वर्या राय खूप आवडते. 


सावळा रंग अन् सोनेरी डोळे, जणू स्वर्गातून उतरली अप्सरा


महाकुंभ 2025 मोनालिसा रातोरात प्रसिद्ध झाली. तिच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची यादी मोठी वाढ झाली आहे. मात्र, इंटरनेट सेन्सेशन बनल्यामुळे मोनालिसाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे तिला कुंभमेळ्यातून इंदूरला घरी परतावं लागलं आहे. प्रसिद्ध झाल्यामुळे लोक फोटो आणि व्हिडीओसाठी तिला त्रास देत आहेत. यामुळे तिच्या माळा विकल्या जात नाहीत, त्यामुळे ती तिच्या घरी परतली आहे. मोनालिसा महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी वडिलांसोबत प्रयागराजला गेली होती, ती 16 वर्षांची असल्याची माहिती आहे.


मोनालिसाचा व्हिडीओ व्हायरल






महत्त्वाच्या इतर बातम्या :


सौंदर्य वरदान की शाप! महाकुंभ मेळ्यातील 'व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या जीवाला धोका? मुख्यमंत्री योगींकडे सुरक्षेची मागणी