Maha Kumbh 2025 : महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात महत्वाच्या आध्यात्मिक कार्यक्रमांपैकी एक आहे. दर 12 वर्षांनी भरणारा हा कुंभमेळा अतुलनीय अनुभव आहे. यंदा आयोजित महाकुंभ मेळा अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे, यासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यंदाच्या कुंभ मेळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. त्यातील सोनेरी डोळ्यांची सुंदरी खूप चर्चेत आहे. कुंभ मेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाच्या जीवाला धोका असल्याचं सांगत, तिने मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
महाकुंभ मेळ्यातील 'व्हायरल गर्ल' मोनालिसा जीवाला धोका?
महाकुंभ मेळ्यात सुंदरतेमुळे व्हायरल झालेली सुंदरी मोनालिसा (Viral Girl Monalisa) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. सुंदरतेमुळे ती सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाली. सावळा रंग आणि सोनेरी डोळे असलेली मोनालिसा मूळची इंदूरची असून तिच्या वडिलांसोबत कुंभमेळ्यात माळा विकायला आली होती. यावेळी तिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आणि सर्वत्र तिचीच चर्चा सुरु झाली. आता कुंभ मेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने जीवाला धोका असल्याचं सांगत, तिने मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री योगींकडे सुरक्षेची मागणी
महाकुंभ मेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकणारी इंदूरची मुलगी मोनालिसा (Viral Beauty Monalisa) सोशल मीडिया खूप व्हायरल होत आहे. महाकुंभातून एका रात्रीत व्हायरल झालेल्या मोनालिसाने तिच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. मोनालिसाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे, असे म्हणत तिच्या जीवाला धोका आहे. मोनालिसाचे सौंदर्य तिच्यासाठी समस्या बनत आहे. तिला महाकुंभ मेळ्यातून माघारी परतावं लागलं आहे. तिला पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी होणाऱ्या गर्दीला त्रासून तिच्या वडिलांनी तिला इंदूरला परत पाठवलं आहे.
'या' कारणामुळे घरी परतण्याची वेळ
व्हायरल झाल्यानंतर, वाढत्या गर्दीच्या दबावामुळे तिला महाकुंभ सोडावं लागलं. आता तिला घराबाहेर पडण्याचीही भीती वाटू लागली आहे कारण ती बाहेर पडताच लोकांच गर्दी जमा होते. यावर प्रतिक्रिया देताना मोनालिसाने सांगितलं आहे की, तिचं सौंदर्य पाहून काही लोकांनी तिला महाकुंभातून नेण्याची धमकीही दिली आहे. मोनालिसाने यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संरक्षणाची विनंती केली आहे. मोनालिसाने सांगितलं की, तिला आणि तिच्या कुटुंबाला आता भीती वाटत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षेची व्यवस्था करावी जेणेकरून ती माळा विकून आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकेल, असं तिने सांगितलं आहे.
"रातोरात स्टार झाल्याचा आनंद, पण..."
मोनालिसाने पुढे सांगितलं की, 'रातोरात स्टार झाल्याचा आनंद आहे. ती आणि तिचे कुटुंब यामुळे आनंदी आहेत, पण जेव्हा-जेव्हा ती माळा विकण्यासाठी फूटपाथवर बसते, तेव्हा लगेच लोकांची गर्दी जमते'. लोक तिला घेरतात आणि तिच्यासोबत बरेच फोटो काढतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :