एक्स्प्लोर
मुंबईतील लोअर परेलचा रेल्वे ब्रिज धोकादायक, दुरुस्तीपर्यंत बंद राहणार
लोअर परेलचा हा रेल्वे ब्रीज 24 जुलै सकाळी 6 वाजल्यापासून दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात येणार असल्याच रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबई : लोअर परेलचा रेल्वे ब्रिज (ना. म. जोशी मार्ग) वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी बंद केला जाणार आहे. या ब्रिजच्या दुरुस्तीचं काम 24 जुलैपासून सुरु केले जाणार आहे. त्यामुळे 24 जुलैपासून दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत ब्रिज बंद राहील. मुंबईतील अंधेरीच्या गोखले पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर रेल्व प्रशासन, आयआयटी मुंबई आणि महापालिका अधिकारी यांनी केलेल्या सेफ्टी ऑडिटनंतर लोअर परेल रेल्वे ब्रिज हा धोकादायक असून तो तात्काळ बंद करण्यात, यावा असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षतेसाठी लोअर परेल रेल्वे ब्रिज (ना. म. जोशी मार्ग) हा वाहनांना वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांना बंद करण्यात येणार आहे. लोअर परेलचा हा रेल्वे ब्रीज 24 जुलै सकाळी 6 वाजल्यापासून दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात येणार असल्याच रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यासोबतच हा ब्रिज बंद झाल्याने कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था प्रशनसनाकडून करण्यात आली आहे.
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली






















