एक्स्प्लोर
एटीएममध्ये लाखो रुपयांच्या नोटा कुरतडल्या? व्हॉट्सअॅपवर मेसेज व्हायरल
एटीएममधील 20 ते 25 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल झाले आहेत.

वसई: एटीएममधील लाखो रुपयांच्या नोटा कुरतडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. एटीएममधील 20 ते 25 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल झाले आहेत. काही मेसेजमध्ये वसईतील अंबाडी रोडवरील HDFC बँकेच्या एटीएममध्ये हे पैसे कुरतडल्याचं सांगण्यात येत आहे. तर काही मेसेजमध्ये नालासोपाऱ्यातील एटीएममध्ये ब्लास्ट झाल्याने पैशाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत स्थानिक संबंधित पोलीस ठाणे, बँक यांच्याशी विचारणा केली असता, या व्हायरल झालेल्या मेसेजला कुठेही दुजोरा मिळत नाही. पण हा मॅसेज सोशल मीडियावरील मात्र मोठा चर्चेचा विषय बनला आहे. व्हॉट्सअपवर व्हायरल झालेली घटना खरीच घडली आहे का? घडली असेल तर कुठे घडली आहे? इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा कोणी कुरतडल्या? हे फोटो खरेच आहेत की मॉर्फ केलेत? असे प्रश्न अनुत्तरीत आहेत. पण असे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करताना, खातरजमा करा, त्यानंतरच पुढे पाठवा.

आणखी वाचा