एक्स्प्लोर

वडापावमध्ये पालीचं मेलेलं पिल्लू आढळलं, अंबरनाथमधील प्रकार

अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता, तिथे बबन वडापाव या दुकानाचं फूड लायसन्स सुद्धा संपल्याचं समोर आलं.

अंबरनाथ : सर्वसामान्य मुंबईकरांचं खाद्य अशी ओळख असलेल्या वडापावमध्ये चक्क मेलेली पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. या प्रकारानंतर वडापाव विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी करण्यात आली आहे. अंबरनाथ पूर्व भागातल्या स्टेशन परिसरात बबन वडापाव हा नामांकित वडापाव विक्रेता असून त्याच्या दुकानात हा प्रकार समोर आला आहे. याच भागातल्या एका कार्यालयात काम करणाऱ्या अल्पा गोहिल या तरुणीने आज सकाळच्या सुमारास ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी म्हणून इथून वडापाव नेले. मात्र वडापाव खाताना त्यात मेलेली पाल आढळून आली. त्यानंतर, गोहिल यांनी पुन्हा दुकानात धाव घेतली असता त्यांना कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे उत्तरं देत अक्षरशः हाकलून दिलं. त्यामुळं ग्राहकांनी तिथे गोंधळ घातला. यानंतर अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता, तिथे बबन वडापाव या दुकानाचं फूड लायसन्स सुद्धा संपल्याचं समोर आलं. धक्कादायक बाब म्हणजे, दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी हा पाल असलेला वडा फेकून दिला असून त्यात पाल होती, अशी कबुलीही दिली आहे. या सगळ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत दुकान बंद केलं. या दुकानावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल दाखल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget