एक्स्प्लोर

‘शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत लवकरच कळवू’, उद्धव ठाकरेंचं शाहांना उत्तर

मुंबई: एनडीएकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाची आज (सोमवार) घोषणा करण्यात आली आहे. याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली. एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यातबाबत ही चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली. ‘अमित शाह यांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांचं नाव उद्धव ठाकरेंना सांगितलं असून त्यासाठी पाठिंबा मागितला आहे. आपण याबाबत लवकरच पक्षाची बैठक घेऊ आणि त्याबाबतचा निर्णय आपल्याला दोन दिवसात कळवू. असं उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना सांगितलं’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ‘शिवसेनेकडून मोहन भागवत किंवा स्वामीनाथन यांची नावं सुचवण्यात आली होती. पण आता भाजपनं रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे याबाबत पक्षाच्या बैठकीत जे काही ठरेल ते शाह यांना कळविण्यात येईल.’ असंही संजय राऊत म्हणाले. रामनाथ कोविंद 'एनडीए'चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार! बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. रामनाथ कोविंद हे दलित नेते म्हणून परिचीत आहेत. त्यांनी सामाजिक कार्य मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर एनडीएचं एकमत झाल्याचं अमित शाह म्हणाले. सध्या बिहारचे राज्यपाल असलेले रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवाशी आहेत. “कोविंद यांच्या उमेदवारीबाबत आम्ही सर्वपक्षीयांशी संपर्क साधून कळवलं आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना फोन करुन याबाबतची माहिती दिली आहे. तसंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही याबाबत सांगितल्याचं” अमित शाह म्हणाले. संबंधित बातम्या: राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याबाबतच्या 10 खास गोष्टी रामनाथ कोविंद 'एनडीए'चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!

महत्त्वाच्या बातम्या

NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Maharashtra Government Doctors Demands : सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Maharashtra Government Doctors Demands : सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
Multibagger Stock : 2 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 360 रुपयांवर पोहोचला, तब्बल 17000 टक्के रिटर्न, 1 लाखांची गुंतवणूक करणारे बनले कोट्यधीश
2 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 360 रुपयांवर पोहोचला, तब्बल 17000 टक्के रिटर्न, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
Sensex Nifty Stock Market : सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी, दुसरीकडे सेन्सेक्स-निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले, ट्रम्प कनेक्शन समोर
सेन्सेक्स-निफ्टीत घसरण, शेअर बाजारात पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचं नुकसान, 6 लाख कोटी बुडाले
Trisha Krishnan : मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
Embed widget