एक्स्प्लोर

पक्ष सोडण्यास कारण की... शिवसेनेतील गयारामांचं उत्तर

मुंबई : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला धक्का देत तीन नेत्यांनी भाजपला जवळ केलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेला नाराजीनाट्य सुरु झालं आणि बंडाळीला ऊत आला. स्थानिक आमदार किंवा खासदारांनी उमेदवारीला आडकाठी केल्यामुळे भाजपचा रस्ता धरल्याचा आरोप 'गयाराम' नेत्यांनी केला आहे. लालबाग-परळमधील हुकमी एक्का असलेले नगरसेवक नाना आंबोले हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेला गळती लागली आहे. विद्यमान नगरसेवक दिनेश पांचाळ आणि मुलुंडमधील शिवसेनेचे नेते, माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांनी  भाजपप्रवेश केला. प्रभाकर शिंदे (मुलुंड) पक्षश्रेष्ठींबाबत आपल्या मनात आदर आहे, पण मुलुंडमध्ये ज्या पद्धतीने तिकीटवाटप करण्यात आलं, त्याबाबत नाराजी असल्याचं प्रभाकर शिंदे यांनी सांगितलं. 1972 पासून शिवसेनेकडून काम करत आहे, विकासाची कामं अद्याप बाकी असल्याचं शिंदे म्हणतात. दिनेश पांचाळ (अणुशक्ती नगर) खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना अणुशक्ती नगर वॉर्ड नंबर 144 मधून उमेदवारी जाहीर झाल्याने दिनेश पांचाळ यांनी शिवसेनेतून काढता पाय घेतला. कार्यकर्ता म्हणून हा आपल्यावर अन्याय असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मातोश्रीबाबत आपल्या मनात आदर आहे, पण शेवाळ यांचा धाक जास्त असल्याचं पांचाळ सांगतात. भाजपकडून दिनेश पांचाळ यांच्या पत्नी अनिता पांचाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाना आंबोले (लालबाग परळ) स्थानिक आमदाराने मला संपवण्याची भाषा केली, त्यामुळे पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचं नाना आंबोले यांनी सांगितलं. मी माझ्या बायकोसाठी एकच तिकीट मागितलं होतं, असं सांगतानाच ज्यांनी संपवण्याची भाषा केली त्यांना काय आहे ते कळेल, असा संताप त्यांनी व्यक्त केला. अमेय घोलेंच्या उमेदवारीला विरोध युवा सेना कोषाध्यक्ष आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अमेय घोले यांना वडाळा वॉर्ड क्र. 178 मधून उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्याला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध होत आहे. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी शिवसेना शाखेला टाळं ठोकलं. इच्छुक उमेदवार माधुरी मांजरेकर समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. किशोरी पेडणेकरांना उमेदवारी शिवसैनिकांची बंडाळी मोडून शिवसेनेने विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिली आहे. पेडणेकर यांना उमेदवारी देण्यास स्थानिक शिवसैनिक, शाखाप्रमुखांचा विरोध होता. शिवसेना नेते राजेश कुसळे यांच्या पत्नी रुपाली कुसळे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी केला होता. पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो मानेन अशी भूमिका किशोरी पेडणेकर यांनी घेतली होती. परंतु शिवसैनिक आणि शाखाप्रमुखांचा विरोध डावलून वॉर्ड क्रमांक 199 (सातरस्ता-डिलाईलरोड-ऑर्थर) रोड इथून किशोरी पेडणेकरांना उमेदवारी दिली.

संबंधित बातम्या

शिवसेना नगरसेवक दिनेश पांचाळही भाजपत

शिवसेनेचा हुकमी एक्का भाजपमध्ये, नाना आंबोलेंचा जय महाराष्ट्र

शिवसैनिकांची बंडाळी मोडीत, किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी

मी महापालिका निवडणूक लढवणार नाही : शुभा राऊळ

मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
जो कथित सिनेमा येतोय..; अशोक खरातवरील सिनेमाचा ट्रेलर येताच, रुपाली चाकणकरांचा संताप, पहिल्यांच प्रतिक्रिया
जो कथित सिनेमा येतोय..; अशोक खरातवरील सिनेमाचा ट्रेलर येताच, रुपाली चाकणकरांचा संताप, पहिल्यांच प्रतिक्रिया
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
Embed widget