एक्स्प्लोर

डेटा लीकच्या भीतीने मंत्रालयात खळबळ

मंत्रालयातील महसूल विभागात आज (मंगळवार) डेटा लीकच्या भीतीने अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई : मंत्रालयातील महसूल विभागात आज (मंगळवार) डेटा लीकच्या भीतीने अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. माहिती तंत्रज्ञान (IT) विभागातील एका संशयित कंत्राटी कर्मचाऱ्याला या प्रकरणात मरीन ड्राइव्ह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रकाश खेडेकर असे या व्यक्तीचं नाव असून त्याचे कंत्राटही रद्द करण्यात आल्याची माहिती संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पहाटे 7 वाजता हा व्यक्ती महसूल विभागातील 20 संगणकांचे CPU (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट) उघडून छेडछाड असल्याचे काही सफाई कर्मचाऱ्यांना आढळले. या कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता त्याने आयटी विभागातून असल्याचे सांगितले. यानंतर महसूल विभागाच्या एका शिपायाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संशयास्पद घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिपाई त्याठिकाणी परतल्यानंतर तो व्यक्ती तिकडून निघून गेल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपास करून या व्यक्तीला मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी तो काम करत असलेल्या सर्व संगणक आणि पेन ड्राइव्ह्जची तपासणी केली मात्र प्रथमदर्शनी कुठलीही संवेदनशील माहिती आढळली नाही. पहिल्या मजल्यावर असलेल्या महसूल विभागातील संगणकांचाही तपास करण्यात येत आहे. महसूल विभागात जमिनींचा मालकी हक्क, त्यातून जमा होणाऱ्या महसुलाचा तपशील, भाडेपट्ट्याने दिलेल्या सरकारी जमिनींचा लेखाजोखा आणि जमिनींचे तंटा-वाद प्रकरणांच्या माहितीचा डेटा या संगणकांमध्ये उपलब्ध असतो. मात्र यापैकी कुठल्या माहितीचा दुरुपयोग किंवा चोरी करण्याच्या हेतूने या संशयिताने हे कृत्य केले आहे का? याचा तपास पोलीस करत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
Maharashtra Live Blog Updates: 20026 ची NEET परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावा लागणार 
Maharashtra Live Blog Updates: 20026 ची NEET परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावा लागणार 

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले

Embed widget