एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकलमध्ये प्रवाशांची अडवणूक, डहाणूवासियांवर RPF चा लाठीमार
विरार : चर्चगेट लोकलमध्ये प्रवाशांची अडवणूक करणाऱ्या डहाणूतल्या रेल्वे प्रवाशांवर आरपीएफ जवानांनी कारवाई केली आहे. विरारमध्ये आरपीएफच्या जवानांनी या उद्दाम प्रवाशांवर लाठीमार केला.
डहाणूचे रेल्वे प्रवासी विरारच्या प्रवाशांना उतरु देत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या कारणावरुन विरारच्या प्रवाशांची अडवणूक करणाऱ्या ग्रुपवर रेल्वेच्या आरपीएफने कारवाई केली.
चर्चगेटहून रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी सुटणाऱ्या चर्चगेट-डहाणू लोकल मधल्या प्रवाशांवर विरारमध्ये बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास लाठीमार करण्यात आला. 14 प्रवाशांवर चेन खेचणे, रेल्वेत हंगामा करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या अंतर्गत कारवाई केली आहे.
लाठीमार करण्याचे कारण
विरारचे प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास न करता लांब पल्ल्यांच्या गाडीत प्रवास करतात त्यामुळे डहाणूकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, याच कारणावरुन विरारला उतरणाऱ्या प्रवाशांना डहाणूच्या प्रवाशांनी विरारला उतरु न देता वैतरणाला उतरवले.
दरम्यान, ही कारवाई राजकीय दबावाखाली झाली असल्याचा आरोप वैतरणा-डहाणू प्रवाशांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्रीडा
निवडणूक
Advertisement