Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उषा मंगेशकर यांनी दिली आहे. उषा मंगेशकर पुढे म्हणाल्या, दीदींची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्या लोकांसोबत बोलू शकतात. पण डॉक्टरांनी त्यांना लोकांबरोबर बोलणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. 


मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतित समदानी म्हणाले, लता मंगेशकर सध्या आयसीयूमध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.





लता मंगेशकरांना घरातील कर्मचार्‍यामार्फत कोरोनाची लागण झाली आहे. उषा मंगेशकरदेखील याला दुजोरा देत म्हणाल्या, दीदींच्या खोलीची साफसफाई करणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळेच लता दीदींनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. 


खबरदारी म्हणून लता मंगेशकर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असले तरी त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना पुढील 7 ते 8 दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे. लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे. 


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे.



संबंधित बातम्या


Lata Mangeshkar Corona Positive : लता मंगेशकरांना घरातील कर्मचार्‍याकडून कोरोनाची लागण


Mumbai Coronavirus Update : कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, टास्क फोर्सचा दावा, मुंबईकरांसाठी सर्वात मोठा दिलासा


Coronavirus Update : दिलासादायक! मुंबईसह राज्यातील रुग्ण वाढ मंदावली