Lata Mangeshkar Corona Positive : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना घरातील कर्मचार्यामार्फत कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आलं असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत. 92 वर्षीय लता मंगेशकर क्वचितच घराबाहेर पडत असतात. कोरोनाकाळात गेल्या दोन वर्षांपासून त्या घराबाहेर पडलेल्या नाहीत. दरम्यान लता मंगेशकर यांना घरातील कर्मचार्याकडून कोरोनाची लागण झाली आहे.
लता मंगेशकर यांच्या घरात अनेक कर्मचारी आहेत. ते कर्मचारी अनेकदा घराबाहेर काही वस्तू आणण्यासाठी जात असतात. दरम्यान घरातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर लता दीदींची चाचणी करण्यात आली असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
खबरदारी म्हणून लता मंगेशकर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असले तरी त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना पुढील 7 ते 8 दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे. लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत.
दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे.
संबंधित बातम्या