एक्स्प्लोर
कामगार नेते एस. आर. कुलकर्णी यांचे निधन

मुंबई: अखिल भारतीय गोदी कामगारांचे नेते आणि ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड एस आर कुलकर्णी यांचं आज सायंकाळी वृद्धपकाळाने निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार संघाच्या एशिया पॅसिफिक रिजनचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम पाहिलं होतं. मुंबई बंदराच्या विकासामध्ये त्यांचे मोलाचं योगदान आहे. गेली 62 वर्ष त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टचं विश्वस्त म्हणून काम पाहिलं होतं. त्यांच्या निधनानं गोदी कामगारांचा एक लढवय्या नेता हरपला आहे. दरम्यान, उद्या सकाळी 9.30 वाजल्यापासून त्यांचे पार्थिव कर्नाक बंदर येथील पी डिमेलो भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी 3.30 वा. चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Before You Go
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story





















