एक्स्प्लोर
Advertisement
कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाचं प्रोमो सॉंग आलं, नागराज मंजुळेंनी रॅप गायलं
विशेष म्हणजे यावेळी ते खुद्द गायकाच्या भूमिकेत आहेत. गाण्याच्या सुरुवातीला नागराज मंजुळे यांचा आवाज आहे. 'म्हणूनच जग म्हणतं, नाही का, उत्तर शोधलं की जगणं बदलतं' या थीमअंतर्गत हे गाणं तयार केलं आहे.
मुंबई : कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या शोचे सूत्रसंचालन अभिनेते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार आहेत. आता या शोच्या नव्या पर्वाचे प्रोमो सॉंग रिलीज झालं आहे. नागराज मंजुळे यांनी या गाण्याचा व्हिडीओ आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला आहे.
विशेष म्हणजे यावेळी ते खुद्द गायकाच्या भूमिकेत आहेत. गाण्याच्या सुरुवातीला नागराज मंजुळे यांचा आवाज आहे. 'म्हणूनच जग म्हणतं, नाही का, उत्तर शोधलं की जगणं बदलतं' या थीमअंतर्गत हे गाणं तयार केलं आहे. गाण्याच्या सुरुवातीला रॅप स्टाईलमध्ये नागराजच्या आवाजात काही ओळी ऐकायला मिळत आहेत. तर उर्वरित गाणं हे संगीत दिग्दर्शक ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी गायिले आहे. हे गीत श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलं आहे. तर या एक मिनिटं 29 सेकंदाच्या गाण्याचे दिग्दर्शन विजय मौर्य यांनी केलं आहे.
कोण बनेगा करोडपतीच्या या नव्या पर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना या गीताला सोशल माध्यमांवर तुफान पसंती मिळत आहे.
सामाजिक विषयांना वाचा फोडून मराठी सिनेमात आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण करणारा दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे या निमित्ताने एका नव्या भूमिकेत दिसून येणार आहेत. नागराजच्या रांगड्या भाषेचा साज आता या रियालिटी शो ला लागणार असल्याने या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
याआधीच्या पर्वाचं नाव ‘कोण होईल मराठी करोडपती’ असं होतं आणि त्याचं सूत्रसंचालन अभिनेता स्वप्निल जोशी करत होता. या पर्वाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.
'कौन बनेगा करोडपती' या हिंदी शोचे सूत्रसंचालन बिग बी अमिताभ बच्चन करतात. नागराज मंजुळे यांच्या आगामी झुंड या सिनेमात बिग बी खुद्द झळकत आहेत. नुकतीच या सिनेमाचे शूटिंग नागपुरात पार पडले आहे. हिंदीतील कौन बनेगा करोडपती देखील लवकरच येणार आहे. त्यामुळे मराठी भाषेत नागराज मंजुळे आणि हिंदीमध्ये अमिताभ बच्चन अशी पर्वणी आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मी या शोमध्ये स्मार्ट दिसतोय, आयुष्यात पहिल्यांदाच मी मोठ्या पार्लरमध्ये जाऊन केस कापले. मी आमचा स्टायलिस्ट आणि डिझायनरने जे काही सांगितलं आहे, ते फॉलो करतोय. मी या शोमुळे पहिल्यांदा चांगलं दिसणं आणि राहण्याचा प्रयत्न करतोय, असं नागराज मंजुळे यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर बोलताना सांगितलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
बीड
मुंबई
Advertisement