मुंबई: घरांच्या किंमती कोविड साथीमुळे वाढत आहेत, साथ असूनही वाढत आहेत असे नाही. नाइट फ्रँकच्या प्राइम इंटरनॅशनल रिसिडेन्शिअल इंडेक्स (पीरी 100)नुसार, जागतिक प्राइम निवासी जागांच्या किंमतींनी गेल्या वर्षाच्या तुलनेत (वायओवाय) 1.9 टक्के वाढीची नोंद केली आहे. लग्झरी हाउसिंग बाजारपेठेने 2020 मध्‍ये अपेक्षेहून अधिक चांगली कामगिरी केली. यातील 100 बाजारपेठांपैकी 66 बाजारपेठांनी 2 टक्के वार्षिक वाढीची नोंद करत पीरीमध्ये स्थान प्राप्त केले. पीरी 100 जगभरातील आघाडीच्या निवासी बाजारपेठांमधील लग्झरी निवासी जागांतील हालचालींचा माग ठेवते.


जागतिक स्तरावर दिल्लीने लग्झरी निवासी दरांबाबत 72 वे स्थान प्राप्त केले, दिल्लीतील दर 2020 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत किंचित कमी (-०.1 टक्का) होते. मुंबई (77वे स्थान) आणि बंगळुरु (79वे स्थान) या बाजारपेठांमधील प्राइम निवासी जागांच्या दरांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अनुक्रमे 1.5 टक्के व 2.0 टक्के घट झाली. पीरी 100 यादीनुसार न्यूझीलंडमधील ऑकलंडने वार्षिक 17.5 टक्के दरवाढीची (वायओवाय) नोंद करून या यादीत अव्वल स्थान प्राप्त केले. तर अर्जेंटिनातील बुनोस एर्स बाजारपेठेचे जगात सर्वाधिक नुकसान झाले, तेथील दरांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 12 टक्के घट झाली.


नाइट फ्रँकमधील आंतरराष्ट्रीय निवासी जागा संशोधन विभागाच्या प्रमुख केट एव्हरेट-अॅलन म्हणाल्या की, “लोकांच्या सेकंड होमच्या अपेक्षा वाढत आहेत. दूरुन काम करण्याची लवचिकता अधिक मिळत असल्याने घरमालक घराबाहेरील मुक्काम लांबवत आहेत आणि यातील अनेकांना यासाठी ‘को-प्रायमरी’ घरे असावीत असे वाटत आहे. वेगवान ब्रॉडबॅण्ड्सपासून सिनेमा रुम्स, जिम्स आणि ए-ग्रेड टेक्नोलॉजीसह सेकंड होमकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.”


1 दशलक्ष डॉलर्समध्ये किती जागा विकत घेतली जाऊ शकते?
मोनाकोने जगातील सर्वांत महागड्या शहराचे आपले बिरुद कायम राखले आहे. येथे 1 दशलक्ष डॉलर्स मोजून 2020 मध्ये केवळ 15 चौरस मीटर जागा खरेदी करणे शक्य होते. तुलनेने मुंबईत तुम्ही एवढ्या पैशात प्राइम निवासी मालमत्तेचे 106 चौरस मीटर (1141 चौरसफूट) खरेदी करू शकता, 2019 मध्ये एवढ्या पैशात 102 चौरस मीटर (1100 चौरसफूट) जागा घेणे शक्य होते.


सामान्य माणसांंसाठी घरांच्या किंमती कमी होणार का? : आमदार आशिष शेलार


नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, “2020 या वर्षामध्ये कोविड-19 साथीमुळे केवळ रिअल इस्टेटच नाही, तर एकंदर अर्थव्यवस्थेमध्येच मंदीचे वातावरण होते. महाराष्ट्र व कर्नाटक सरकारांच्या मुद्रांक शुल्कात कपात करण्याच्या निर्णयासारख्या काही धोरणात्मक निर्णयांमुळे साथीने केलेले नुकसान काही अंशी भरून काढून समतोल साधण्याचा प्रयत्न झाला आहे. मुंबईमध्ये 2020 च्या चौथ्या तिमाहीत लग्झरी निवासी जागांच्या विक्रीत मोठी वाढ दिसून आली आणि 2021 मधील मागणीचे चित्र स्थितीस्थापक भासत आहे. देशातील तसेच जगातील संपन्न व्यक्तींना भारतीय शहरांमध्ये लग्झरी निवासी मालमत्ता खरेगी करायची असेल तर सध्याचे बाजारभाव अव्वल मूल्य देऊ करत आहेत.”


प्राइम निवासी रिअर इस्टेटसाठी चालक घटक:
नाइट फ्रँकच्या आगामी वेल्थ रिपोर्ट 2021 नुसार, अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्सपैकी (ज्यांची प्राथमिक निवास धरून निव्वळ मालमत्ता 30 दशलक्ष डॉलर्सहून अधिक आहे) 26 टक्के व्यक्ती 2021 मध्ये घर खरेदीचे नियोजन करत आहेत. यामागील प्रमुख इच्छा प्राथमिक निवासी जागा अपग्रेड करणे हीच आहे. जागतिक स्तरावर कोविड साथीमुळे स्वास्थ्याला अनुकूल स्थळांची मागणी प्रचंड वाढते आहे- उदाहरणार्थ, पर्वत, तलाव आणि समुद्रकिनाऱ्यानजीकची घरे. भारतातील अतिश्रीमंतांपैकी 19 टक्के 2021 मध्ये घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत यावरही अहवालाने प्रकाश टाकला आहे.


बिल्डरांना मोठा दिलासा, प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर