एक्स्प्लोर

खारघरमधील रिक्षाचालकांचा संप 20 व्या दिवशी मागे

खारघरमधील रिक्षाचालकांचं आंदोलन 20 व्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे. खारघर एकता रिक्षा युनियनने संप मागे घेत असल्याची घोषणा केली.

नवी मुंबई : खारघरमधील रिक्षाचालकांचं आंदोलन 20 व्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे. खारघर एकता रिक्षा युनियनने संप मागे घेत असल्याची घोषणा केली. आंदोलन मागे खारघरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 21 नोव्हेंबर रोजी हद्दीच्या वादातून खारघर रेल्वे स्थानकावर रिक्षाचालकांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी सात रिक्षाचालकांना अटक करण्यात आली होती. यानंतर खारघरमधल्या 800 रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता. तळोजा रिक्षाचालकांनी दगडफेक करुन मारहाण केली असतानाही खारघर रिक्षाचालकांना अटक केली, असा आरोप खारघरमधील रिक्षाचालकांनी केला होता. रिक्षाचालकांच्या संपामुळे खारघरमधील रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पण 28 नोव्हेंबर रोजी संप मागे घेत असल्याची घोषणा रिक्षा युनियनने केली होती. पण दुसऱ्या दिवशी संघटनांनी मुजोरी कायम ठेवत, संप सुरुच ठेवला होता. त्यामुळे वाहतूक शाखेनं रिक्षाचालकांच्या मुजोरीविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. आंदोलन मागे न घेतल्यास, रिक्षाचालकांचे परवाने रद्द करण्याचा इशारा पनवेल वाहतूक शाखेने दिला होता. त्यासाठी पनवेल आरटीओने विनापरवाना रिक्षा, ड्रेसकोड नाही असे रिक्षाचालक, मीटरप्रमाणं भाडं न आकारणाऱ्या रिक्षाचालकांसह, ज्या रिक्षा संपात सहभागी झाल्यात अशा सर्वांना परवाने रद्द करण्याच्या नोटिसाही बजावल्या होत्या. आरटीओच्या कठोर भूमिकेनंतर रिक्षाचालक संघटनांनी सावध पवित्रा घेत, आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. आज दुपारी 3 वाजल्यापासून रिक्षा पुन्हा सुरु होतील, अशी माहिती खारघर एकता रिक्षा युनियनच्या वतीने देण्यात आली.

संबंधित बातम्या

नवी मुंबईतील खारघरमधल्या रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे

खारघरचा वाली कोण? आठवड्यापासून रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल

महत्त्वाच्या बातम्या

मेणामध्ये सोन्याची पावडर, 23 कॅप्सूल्स शरीरात लपवून सोन्याची तस्करी, किंमत तब्बल 13 कोटी, सोन्यासह हिऱ्यांच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त 
मेणामध्ये सोन्याची पावडर, 23 कॅप्सूल्स शरीरात लपवून सोन्याची तस्करी, किंमत तब्बल 13 कोटी, सोन्यासह हिऱ्यांच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त 
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
CJP Mumbai Protest : सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Politics : सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
Flydubai Cockpit Incident : 'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
Rahul Gandhi On Election Commission : लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
Asian Games 2026 : आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी

Embed widget