एक्स्प्लोर

वाधवान बंधूंचा जेलमधील मुक्काम वाढला; 10 मे पर्यंत सीबीआय कोठडी

कपिल आणि धीरज वाधवानला 10 मे पर्यंत सीबीआय कोठडी. राणा कपूरशी असलेले संबंध आणि येस बँक घोटाळ्याची सखोल चौकशी होणं गरजेचं : सीबीआय

मुंबई : डीएचएफएल आणि येस बँक गैरव्यवहारातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांचा तपासयंत्रणेच्या ताब्यातील मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं त्यांना 10 मेपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपासयंत्रणेनं या दोघांची कोठडी संपत असल्यानं त्यांना शुक्रवारी पुन्हा कोर्टात हजर केलं होत. या दोघांसह तपासयंत्रणेनं नुकतीच त्यांच्या महाबळेश्वरमधील बंगल्याची झडती घेतली आहे. याप्रकरणी येस बँकेचे सर्वेसर्वा राणा कपूर यांच्यासोबत वाधवान यांचे संबंध आणि येस बँक घोटाळ्यामागचं षडयंत्र याचा खोलवर तपास होणं गरजेचं आहे. त्यामुळे कपिल आणि धीरज या वाधवान बंधूंची कोठडी सीबीआयनं वाढवून मागितली.

वाधवान यांच्यावतीनं सीबीआयच्या या मागणीचा विरोध करण्यात आला खरा मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं वाधवान बंधूंची सीबीआय कोठडी आणखीन दोन दिवसांनी वाढवून दिली. जामीनावर असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही विशेष परवानगी काढत महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास केल्यामुळे वाधवान बंधू काही दिवसांपूर्वी नव्यानं वादात अडकले होते.

येत्या दहा दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होणार : नितीन गडकरी

कुख्यात गँगस्टर इक्बाल मिर्चीची मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी ईडीने जानेवारीत कपिल वाधवानला अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच येस बँकेच्या 37 हजार कोटींच्या कर्ज मंजुरीच्या बदल्यात त्याने बँकेचा प्रमुख राणा कपूर व त्यांच्या कुटुंबियाच्या परदेशातील बँक खात्यावर 600 कोटींची लाच दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्याविरोधात सीबीआयनं 7 मार्च रोजी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

राणा कपूर बँकेचा सीईओ असताना सुमारे 37 हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप झालं होतं. यापैकी सुमारे 20 हजार कोटी रुपयांची कर्ज बोगस असल्याचा दावा तपासयंत्रणेने केला आहे. त्याचबरोबर त्यानं सुमारे 20 हजार 210 कोटी रुपयांची कर्ज काही दिवाळखोरी जाहीर केलेल्या कंपन्यांसाठी मंजूर केल्याचेही उघड झाले आहे. यामध्ये वाधवान यांच्या डीएचएफएल कंपनीचाही सहभाग आहे. राणा कपूर यांच्या कुटुंबियांच्या नावावर एकूण 78 कंपन्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे कागदावर दाखवण्यासाठी या 20 हजारांपैकी संबंधित कंपन्यांना कर्ज दिली गेली आहेत का?, याची तपासणी करणं गरजेचं आहे. तपासयंत्रणेला शंका आहे की हा सारा पैसा याच कंपन्यात विखुरलेला असण्याची दाट शक्यता आहे.

#WadhwanCase | वाधवान प्रकरणी अमिताभ गुप्तांकडून पत्र स्वत: दिल्याचं कबूल, गृहमंत्र्यांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Mumbai BEST Bus Accident: भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनियंत्रित बसने पादचाऱ्याला चिरडलं, तर वाशी टोलनाक्यावर चालकाला अचानक फिट आली अन् बस थेट....
भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनियंत्रित बसने पादचाऱ्याला चिरडलं, तर वाशी टोलनाक्यावर चालकाला अचानक फिट आली अन् बस थेट....
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Embed widget