एक्स्प्लोर

कल्याण डोंबिवलीत एक खड्डा बुजवण्यासाठी तब्बल 22 हजार रुपयांचा खर्च!

हिशोब केल्यास एक खड्डा बुजवण्यासाठी तब्बल 22 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब स्पष्ट होत आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी केडीएमसीनं डांबर वापरलं? की सोन्याच्या विटा वापरल्या? असा उपरोधिक सवाल उपस्थित केला जात आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्याचं काम सुरू असून यात प्रत्येक खड्डा भरण्यासाठी तब्बल 22 हजार रुपये खर्च केले जात आहेत. या अफाट खर्चाने खड्डेभरणीत सोन्याच्या विटा वापरल्या जातायत की काय? असा उपरोधिक सवाल विचारला जात आहे. यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली शहरांमध्ये विक्रमी खड्डे पडले होते. त्यामुळं खड्ड्यांवर रॅप सॉंग, खड्ड्यांचं मनोवृत्त सांगणारे व्हिडीओ सुद्धा कल्याण डोंबिवलीकरांनी तयार केले. हे खड्डे बुजवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 17 कोटी रुपये मंजूर केले होते. यंदा लांबलेला पावसाळा संपताच खड्डेभरणीचं काम हाती घेण्यात आलं. मात्र या खड्डेभरणीच्या कामाची माहिती जागरूक नागरिक मंचाचे श्रीनिवास घाणेकर यांनी माहितीच्या अधिकारात मागवली आणि खड्डेभरणीचा झोल उघड झाला. कारण डोंबिवलीपासून टिटवाळ्यापर्यंत विस्तारलेल्या केडीएमसी क्षेत्रात यंदा 6 हजार 143 खड्डे पडले होते. यापैकी शहरातील 5 हजार 283 खड्डे बुजवण्यात आले असून त्यासाठी ठेकेदाराला 11 कोटी 90 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. ही आकडेवारी पाहून हिशोब केल्यास एक खड्डा बुजवण्यासाठी तब्बल 22 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब स्पष्ट होत आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी केडीएमसीनं डांबर वापरलं? की सोन्याच्या विटा वापरल्या? असा उपरोधिक सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे याच कथित भ्रष्टाचारावरून मनसेनं नुकत्याच झालेल्या महासभेत सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केलं. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी सत्तेत सहभागी असलेल्या भाजपनेही मनसेला पाठिंबा देत शिवसेनेला धारेवर धरलं. खड्डेभरणी सुरू असली, तरी शहरातील खड्डे मात्र बुजवल्याचं दिसत नाही. त्यामुळे भाजपच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारल्याचं भाजपचे गटनेते विकास म्हात्रे यांनी सांगितलं. तर या सगळ्यात निश्चितपणे मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप जागरूक नागरिक मंचाचे श्रीनिवास घाणेकर यांनी केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका आता वर्षभरावर आल्या असून त्यापूर्वीच शिवसेना भाजपातील संबंध स्थानिक पातळीवरही ताणले जात असल्याचं यानिमित्ताने पाहायला मिळतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Sanjay Raut: हे कसले जेन -Z? यात सगळी भाजप अन् संघ परिवारातली मुलं आणि नातवंड; मोहन भागवतांच्या मुंबईतील संवाद कार्यक्रमावरून संजय राऊतांच्या हल्लाबोल
हे कसले जेन -Z? यात सगळी भाजप अन् संघ परिवारातली मुलं आणि नातवंड; मोहन भागवतांच्या मुंबईतील संवाद कार्यक्रमावरून संजय राऊतांच्या हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Embed widget