खदाणीत बुडालेल्या आई आणि बहिणीला वाचवताना 16 वर्षीय मुलगी बुडाली

खदाणीत बुडणाऱ्या आई आणि बहिणीला वाचवताना 16 वर्षीय मुलगी बुडल्याच हृदयद्रावक घटना डोंबिवली कोळेगावमध्ये घडली आहे. अग्निशमन दलाकडून मुलीचा शोध सुरु आहे.

Continues below advertisement

कल्याण : खदाणीत बुडत असलेल्या आपल्या आई आणि बहिणीला वाचवण्यास गेलेली 16 वर्षीय मुलगी बुडाल्याची हृदयद्रावक घटना डोंबिवली कोळेगाव परिसरात घडली आहे. अग्निशमन विभागाकडून या खदाणीत खदाणीत शोध कार्य सुरु आहे.

Continues below advertisement

डोंबिवली कोळेगाव परिसरात विवेकानंद शेट्टी हे आपल्या पत्नी गीता आणि चार मुलांसह राहतात. रविवारी (28 डिसेंबर) दुपारच्या सुमारास विवेकानंद यांची पत्नी गीता आपल्या चार वर्षाची मुलगी परी आणि 16 वर्षाची मुलगी लावण्या हिच्यासह कपडे धुण्यासाठी घरानजीक खदाणीत गेल्या होती. गीता कपडे धुवत असताना त्यांची लहान मुलगी परी याच ठिकाणी खेळत होती. खेळता खेळता परीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. मुलगी बुडत असल्याचे पाहून गीता यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र गीता यांनाही पोहता येत नव्हते.आई आणि बहीण पाण्यात बुडत असल्याचे पाहून घाबरलेल्या लावण्याने दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. परंतु लावण्याला देखील पोहता येत नव्हते. मात्र मोठ्या धाडसाने तिने आईसह आपल्या लहान बहिणीचा जीव वाचवला. मात्र लावण्याला पोहता येत नसल्याने ती पाण्यात बुडाली.

गीता यांनी लावण्याला वाचवण्यासाठी आरडाओरड केला, मात्र आसपास कुणीही नसल्याने त्या हतबल झाल्या. काही वेळाने नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांसह अग्निशमन विभागाने घटनास्थळी दाखल होत तातडीने लावण्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रात्र झाल्याने शोध कार्य थांबवण्यात आलं. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु केलं जाणार आहे.

दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आपली मुलगी बुडाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मानपाडा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola