Thackeray Brothers Unite : राज-उद्धव एकत्र, 5 जुलैला Worli Dome मध्ये 'Marathi Vijay Diwas'
पाच जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी जनांना वाजतगाजत आणि जल्लोषात गुलाल उधळत येण्याचे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आणि राज ठाकरे यांच्या मनसेकडून या मेळाव्याची तयारी सुरू आहे. दोन्हीकडील नेत्यांच्या बैठका देखील सुरू झाल्या आहेत. पाच जुलैला साधारण बारा ते साडेबाराच्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल. हिंदी विरोधाच्या मुद्द्यावरून सूर जुळलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षांनंतर या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळणार आहेत. मराठीच्या मुद्द्यावर जीआर रद्द झाल्याचा जल्लोष या मेळाव्यात करण्यात येणार आहे. या निमंत्रण पत्रिकेवर राज ठाकरेंचं नाव आधी आणि उद्धव ठाकरेंचं नाव नंतर आहे. ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर त्याविषयी आता दुमत असण्याचे आणि शंका असण्याचे कारण नाही. शिवसेना उबाटा आणि मनसेच्या नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नेत्यांमध्ये चाळीस मिनिटं चर्चा झाली. 'कोणताही राजकीय अजेंडा नाही, कोणताही राजकीय झेंडा नाही हा मुद्दा दोन्ही बाजूचे नेते ठासून सांगत आहेत.' ही अराजकीय निमंत्रण पत्रिका असून मराठी माणसांच्या विषयासाठी दोन बंधू एकत्र आले आहेत. हा मराठी माणसांसाठी विजयी दिवस असणार आहे. भाजपा आणि शिवसेनेचे नेते मेळाव्याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत. या मेळाव्याकडे महायुती सरकारचे लक्ष असेल. बच्चू कडूंनी ठाकरेंच्या मेळाव्याला शेतकरी दिनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला जोडले. मराठी शेतकऱ्याचे, मजुरांचे आणि अपंग दिव्यांगाचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिंदेंच्या शिवसेनेकडून हिंदी विरोधात फेक नरेटिव पसरवल्याचा आरोप केला जात आहे. या मेळाव्यावर आगामी काळातील अधिक राजकीय गणितही अवलंबून असतील.