City 60 : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 01 जुलै 2025

आजपासून रेल्वेचा प्रवास महागला आहे. जवळपास पाच वर्षांनंतर रेल्वेच्या भाड्यात वाढ झाली आहे. एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर दोन पैसे आणि नॉन एसी स्लीपर क्लासमध्ये प्रति किलोमीटर एक पैसे वाढ झाली आहे. नागपूरच्या गोरेवाडी प्राणीसंग्रहालयात लवकरच आफ्रिकन सफारीचा अनुभव घेता येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीत एफ डी सी एम गोरेवाडा झू लिमिटेड आणि एन बी सी सी मध्ये सामंजस्य करार झाला. नाशिकच्या करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेसाठी डमी परीक्षार्थींचा वापर केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बोरिवलीत वाहतूक पोलिसांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. पार्किंगमधून गाड्यांचे फोटो काढून हॉटेलमध्ये बसून चलान मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हिजाब का घालू देत नाही या वादावरून छत्रपती संभाजीनगरच्या पी एस महाविद्यालयात टोळक्याने हिंगाणा केला. शहापूर तालुक्यात विद्यार्थ्यांनी एस टी बससमोर ठिय्या देत बस रोखली. सारंगपुरी, मुरबीचा पाडा, अवकलवाडी, कोठारे या भागात बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थी संतप्त झाले. आयआयटी मुंबईत घुसखोरी करणाऱ्या आरोपीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएनजर दाखविण्यासाठी एकतीस बोगस ईमेल आयडी वापरले होते. "तुम्ही सरकारला एकत्रित न बोलावं, आम्ही फक्त मेळाव्याचे आयोजन जल्लोष तुम्ही करायचा" असे आवाहन ठाकरे बांधूंनी केले आहे. पाच जुलैला मराठी विजय मेळाव्याचं आयोजन वरळी डोममध्ये होणार आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मेळावा होणार आहे. मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाईवर नियोजनाची जबाबदारी आहे. मोदी, शाह, फडणवीसांना पाच तारखेच्या मेळाव्याचं निमंत्रण देणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. "तिघांनी शिवसेना फोडली तरी टायगर अभी झिंदा" असे म्हणत राऊतांनी टीका केली. मुंबईच्या गिरगाव परिसरात राज आणि उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेबांसोबत भावनिक फोटो असलेले बॅनर लवकरच एक व्हा बॅनरवर असेल. मुंबई भाजपा अध्यक्षपदाबाबत भाजपात अद्यापही निर्णय नाही. मुंबई मनपा निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वात होण्याची शक्यता आहे. सांगलीत ज्येष्ठ अमावस्येला तडकडताईचा उत्सव साजरा झाला. अंगावर साडी, काळा मुखवटा, हातात असून तडकडत आई शहरात धावते. दैत्यसंहाराच्या आख ठेव केंद्रीय सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले. भिवंडीतील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे भाजपने रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे भिवंडी वाडा महामार्ग ठप्प झाला. विरार लोकल मधील महिला मारहाण प्रकरणी प्रकरण ताजे आहे. उभी वरुन सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी झाली. मिरारोडमध्ये अमराठी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मराठी बोलण्यास नकार दिल्याचा दुकानदाराचा आरोप आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola