Coronavirus Cases Today in India : देशात प्राणघातक कोरोना विषाणूच्या साथीच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे एक लाख 61 हजार 386 नवीन रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत आज कोरोनाच्या 3.4 टक्के कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील कोरोनाचा दैनंदिन सकारात्मकता दर आता 10 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 164.89 कोटीहून अधिक डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या लसीचे 11.48 कोटी पेक्षा जास्त डोस आहेत.


आतापर्यंत 167 कोटींहून अधिक डोस देण्यात आले 


देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे 167 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात 57 लाख 42 हजार 659 लसींचे डोस देण्यात आले. तर, आतापर्यंत 167 कोटी 29 लाख 42 हजार 707 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, लसीचे 164.89 कोटीहून अधिक डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या लसीचे 11.48 कोटी पेक्षा जास्त डोस उपलब्ध आहेत.





 


जगभरात 10 आठवड्यांत 9 कोटींहून अधिक ओमायक्रॉन रुग्णांची नोंद


जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, 10 आठवड्यांपूर्वी कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा समोर आला. तेव्हापासून आतापर्यंत जगभरात ओमायक्रॉनच्या संसर्गाची 9 कोटींहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ही रुग्ण संख्या 2020 वर्मषाध्ये नोंदवलेल्या एकूण रुग्ण संख्येपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीची सुरुवात 2020 मध्ये झाली होती.


संबंधित बातम्या :




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha