Mumbai Ghatkopar News : मुंबई : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात (Ram Mandir) रामललाचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम (Shri Ram) मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली. आता जितेंद्र आव्हाडांना प्रभू श्रीरामाबाबतचं वक्तव्य भोवणार असंच दिसत आहे. जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली असून आमदार राम कदम (Ram Kadam) तक्रार दाखल करणार आहेत. तसेच, घाटकोपरमध्ये
घाटकोपरमध्ये भाजपचं आंदोलनही सुरू आहेत. याशिवाय मुंबई, पुणे आणि नाशकातही आंदोलन सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम (Shri Ram) मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. अशातच भाजप आमदार राम कदम आव्हाडांविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. तसेच, जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करा, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाडांना अटक करा : राम कदम
श्रीराम मांसाहारी होते याचा पुरावा आव्हाडांनी द्यावा, पुरावा नसेल तर आव्हाडांनी देशाची, राम भक्तांची माफी मागावी, भव्यदिव्य राममंदिर बनतंय यामुळे त्यांच्या पोटात दुखतंय, असं राम कदम म्हणाले आहेत. तसेच, जितेंद्र आव्हाडांना अटक करा, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
महात्मा गांधीचं नेतृत्वही मान्य नाही : जितेंद्र आव्हाड
ओबीसींच्या मुद्यावरून आव्हाड यांनी भाजपवर टीका केली. भाजप आता ओबीसींची बाजू आता घेते आणि पूर्वी मंडल विरुद्ध कमंडल हे कुणी केलं होतं तर ते भाजपने केलं होतं. बावनकुळे यांना प्रश्न आहे की ज्यावेळी मंडल विरूद्ध कमंडल यात्रा निघाली त्यावेळी तुम्ही कोणत्या चाकावर बसला होता? असा सवालही आव्हाड यांनी केला.
शाहू महाराजांची हत्या करण्याचा कुणी कट रचला होता? बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार कूणी केला हे पाहिलं हवं. शेवटी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क आपल्याला दिले असल्याचे आव्हाड यांनी म्हटले.
महात्मा गांधी यांचं नेतृत्व यांना फार अगोदरपासून मान्य नव्हतं असा आरोपही आव्हाड यांनी केला. त्यांच्यावर 1947 साली हल्ला झाला नव्हता त्यांच्यावर 1935 आणि 1937 या वर्षातही हल्ला झाला होता. कारण काय तर गांधी हे बानिया होते म्हणजे ओबीसी होते आणि ओबीसी च नेतृत्व हे त्यावेळीस सुद्धा मान्य नव्हते असेही आव्हाड यांनी म्हटले.
पाहा व्हिडीओ : Ram Kadam on Jitendra Awhad : Shree Ram मांसाहार करत असते तर त्यांचा प्रसाद मांसाहारी असता
महत्त्वाच्या इतर बातम्या :