Jitendra Awhad On Ram :  राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता तो 14 वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.


जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केले. 


भाजपवर टीकास्त्र


ओबीसींच्या मुद्यावरून आव्हाड यांनी भाजपवर टीका केली. भाजप आता ओबीसींची बाजू आता घेते आणि पूर्वी मंडल विरुद्ध कमंडल हे कुणी केलं होतं तर ते भाजपने केलं होतं. बावनकुळे यांना प्रश्न आहे की ज्यावेळी मंडल विरूद्ध कमंडल यात्रा निघाली त्यावेळी तुम्ही कोणत्या चाकावर बसला होता? असा सवालही आव्हाड यांनी केला. 


शाहू महाराजांची हत्या करण्याचा कुणी कट रचला होता? बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार कूणी केला हे पाहिलं हवं. शेवटी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क आपल्याला दिले असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. 


महात्मा गांधीचेही नेतृत्व मान्य नाही 


महात्मा गांधाी यांचं नेतृत्व यांना फार अगोदरपासून मान्य नव्हतं असा आरोपही आव्हाड यांनी केला. त्यांच्यावर 1947 साली हल्ला झाला नव्हता त्यांच्यावर 1935 आणि 1937 या वर्षातही हल्ला झाला होता. कारण काय तर गांधी हे बानिया होते म्हणजे ओबीसी होते आणि ओबीसी च नेतृत्व हे त्यावेळीस सुद्धा मान्य नव्हते असेही आव्हाड यांनी म्हटले. 


अजित पवारांवर हल्लाबोल 


जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात वेगळ्या मुद्यांना स्पर्श करताना पक्षाच्या फुटीवरही भाष्य केले. 2019 मध्ये बंड केल्यानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर बसवणं ही राष्ट्रवादीची सगळ्यात मोठी चूक होती. जिथे जिथे संधी मिळाली तिथे साहेबांचा माणसांचा अपमान केला. दत्ता मेघे यांच्या उदाहरण आहे.


शरद पवार तुम्ही यांचे परतीचे दरवाजे बंद करा. ते तुमच्यावर बोलतील. तर एक मिनिटात त्यांच्यावर प्रत्युत्तर दिलं जाईल.  ते तुमच्या वयाबद्दल बोलतात. दिलीप वळसे पाटील या वयात काय? असा सवाल करताना वळसे पाटील हे मुंबई ते आंबेगाव असे मॅरेथॉन धावणार आहेत का असा मिश्किल प्रश्नही आव्हाड यांनी केला.