गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत.

नवी मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याचा बळी दिल्याची जहरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होतेय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोपरखैरणेत पार पडलेल्या सभेत आव्हाड यांनी गणेश नाईकांवर जोरदार हल्लाबोल केला.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्योरोपांना सुरुवात झाली आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. नवी मुंबईतील कारखाने, दगडखाणींकडून ते खंडणी वसूल करत असल्याचा गंभीर आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भाजपने गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक यांना नवी मुंबईतून उमेदवारी दिली होती. मात्र वडील गणेश नाईक यांनी राजकीय महत्वाकांक्षेसाठी मुलाच्या राजकीय कारकिर्दीचा बळी घेतला. असा व्यक्ती कार्यकर्त्यांना कसा न्याय देणार? असा प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर सडकून टीका केली.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वातावरण निर्मितीसाठी आमदार रोहित पवार यांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोपरखैरणे येथे झालेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांचा समाचार घेतला. गणेश नाईक राष्ट्रवादीमध्ये असताना शरद पवार यांनी नाईकांना सर्व काही दिले. मात्र त्यानंतरही ते राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले. जे आयुष्यात बाळासाहेब ठाकरे यांचे होवू शकले नाहीत, शरद पवार यांचे काय होणार, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.
नवी मुंबईत गणेश नाईकांकडून सर्वात मोठी खंडणी वसूल केली जात आहे. येथील कारखाने, दगडखाणींमधून खंडणी वसूल करणाऱ्या नाईकांची सल्तनत नेस्तनाबूद करण्याचं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीत रोहित पवार, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला. वाशी ते कोपरखैरणे मार्गावर बाईक रॅली काढण्यात आली. येत्या मनपा निवडणूकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार कामाला लागण्याचे आवाहन यावेळी कार्यकत्यांना करण्यात आलं.
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj






















