एक्स्प्लोर

व्यापारी उदानी हत्येप्रकरणी प्रकाश मेहतांचा माजी सचिव अटकेत

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवारला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचीही या प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई : मुंबईतील व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्या प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवारला अटक करण्यात आली आहे. घाटकोपरमधले दागिन्यांचे व्यापारी राजेश्वर उदानी यांचा मृतदेह पनवेलच्या जंगलात आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. 57 वर्षीय राजेश्वर उदानी 28 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. उदानींच्या नातेवाईकांनी पंतनगर पोलिस ठाण्यात उदानी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर 4 डिसेंबरला पनवेल पोलिसांना नेरे गावातील जंगलात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह व्यापारी राजेश्वर यांचाच असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी काल कपडे आणि बेल्टवरुन ओळखलं. व्यापारी उदानी हत्येप्रकरणी प्रकाश मेहतांचा माजी सचिव अटकेत आरोपी सचिन पवार पोलिसांनी यापूर्वी काही बारबाला आणि प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवारची चौकशी केली होती. अपहरणानंतर राजेश्वर उदानींची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर सचिन पवारला शनिवारी बेड्या ठोकण्यात आल्या. विशेष म्हणजे एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचीही या प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोण आहे सचिन पवार? - सचिन पवार हा 2009 मध्ये भाजपचा बूथ प्रमुख होता - 2012 मध्ये अपक्ष म्हणून महापालिका निवडणूक लढला. त्यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली - 2017 महापालिका निवडणुकीत पत्नी साक्षी पवारला भाजपमधून तिकीट मिळालं - पत्नीच्या उमेदवारीनंतर सचिन पवारची भाजपमध्ये घरवापसी - सध्या सचिन पवार पक्षात आहे, पण कोणत्याही पदावर नाही सचिन पवारशी संबंध नाही - मेहता घाटकोपरमध्ये एका उद्योजकाच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सचिन पवार आणि माझा कशाही प्रकारे संपर्क आणि संबंध नाही. 2004 ते 2009 या कालावधीत तो माझ्याकडे  सहाय्यक म्हणून काम करत होता. परंतु त्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढल्यामुळे पक्षाने त्याच्यावर कारवाई करत त्याला पक्षातून काढून टाकले. तेव्हापासून आजपर्यंत या व्यक्तीशी माझा संपर्क आलेला नाही. या 9 वर्षात पक्ष स्तरावर आणि कर्मचाऱ्याच्या स्वरुपात सुद्धा माझा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क नाही. आताही तो माझा सहाय्यक नाही. अशा परिस्थितीत सचिन पवारसोबत माझं नाव जोडणं अत्यंत चुकीचं आहे. मुंबई पोलिस देशातील एक सक्षम यंत्रणा आहे. म्हणून मला वाटतं की पोलिस उपायुक्त जलदगतीने अधिक योग्य कारवाई करून गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देतील, अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल

Embed widget