एक्स्प्लोर

व्यापारी उदानी हत्येप्रकरणी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य ताब्यात

सचिन पवारला शनिवारी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. देवोलिना ही सचिन पवारसोबत गुवाहाटी येथे होती. मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं होतं.

मुंबई : मुंबईतील व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्या प्रकरणात प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य हिला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. याआधी पोलिसांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवारला अटक केली आहे.

देवोलिना ही सचिन पवारसोबत गुवाहाटी येथे होती. मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं होतं. देवोलिना हिचा राजेश्वर उदानी यांच्या हत्या प्रकरणात नेमका काय सहभाग काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. देवोलिना ही 'साथ निभाना साथिया' या प्रसिद्ध हिंदी मालिकेतील अभिनेत्री आहे. गोपी बहु हे तिचे गाजलेले पात्र होते.

व्यापारी उदानी हत्येप्रकरणी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य ताब्यात

57 वर्षीय राजेश्वर उदानी 28 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. उदानींच्या नातेवाईकांनी पंतनगर पोलीस ठाण्यात उदानी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर 4 डिसेंबरला पनवेल पोलिसांना नेरे गावातील जंगलात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह व्यापारी राजेश्वर यांचाच असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी काल कपडे आणि बेल्टवरुन ओळखलं.

पोलिसांनी यापूर्वी काही बारबाला आणि प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवारची चौकशी केली होती. अपहरणानंतर राजेश्वर उदानींची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर सचिन पवारला शनिवारी बेड्या ठोकण्यात आल्या. विशेष म्हणजे एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचीही या प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहे सचिन पवार?

- सचिन पवार हा 2009 मध्ये भाजपचा बूथ प्रमुख होता - 2012 मध्ये अपक्ष म्हणून महापालिका निवडणूक लढला. त्यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली - 2017 महापालिका निवडणुकीत पत्नी साक्षी पवारला भाजपमधून तिकीट मिळालं - पत्नीच्या उमेदवारीनंतर सचिन पवारची भाजपमध्ये घरवापसी - सध्या सचिन पवार पक्षात आहे, पण कोणत्याही पदावर नाही

सचिन पवारशी संबंध नाही - मेहता

घाटकोपरमध्ये एका उद्योजकाच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सचिन पवार आणि माझा कशाही प्रकारे संपर्क आणि संबंध नाही. 2004 ते 2009 या कालावधीत तो माझ्याकडे सहाय्यक म्हणून काम करत होता. परंतु त्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढल्यामुळे पक्षाने त्याच्यावर कारवाई करत त्याला पक्षातून काढून टाकले. तेव्हापासून आजपर्यंत या व्यक्तीशी माझा संपर्क आलेला नाही. या 9 वर्षात पक्ष स्तरावर आणि कर्मचाऱ्याच्या स्वरुपात सुद्धा माझा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क नाही. आताही तो माझा सहाय्यक नाही. अशा परिस्थितीत सचिन पवारसोबत माझं नाव जोडणं अत्यंत चुकीचं आहे. मुंबई पोलिस देशातील एक सक्षम यंत्रणा आहे. म्हणून मला वाटतं की पोलिस उपायुक्त जलदगतीने अधिक योग्य कारवाई करून गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देतील, अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

व्यापारी उदानी हत्येप्रकरणी प्रकाश मेहतांचा माजी सचिव अटकेत

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Uddhav Thackeray : लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल
लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Mumbai Sakinaka Manhole: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget