JEE Main 2023: आयआयटी अभियांत्रिकी (IIT Engineering) शाखेच्या प्रवेशामध्ये पात्रता परीक्षा (Exams) असताना 75 टक्के गुणांच्या पात्रता निकषाचा गरजच काय? असा सवाल हायकोर्टानं (High Court) गुरुवारी केंद्रीय परीक्षा संस्थेला (NTA) केला आहे. राज्य परीक्षा मंडळांसह (Education News) एकूण 30 परीक्षा मंडळं सध्या देशभरात कार्यरत असून प्रत्येक मंडळ पर्सेंटाईल यादी प्रसिद्ध करत नाही. त्यामुळे या पद्धतीचा लाभ केवळ काही परीक्षा मंडळांनाच होईल. मग ही शिथिलता किती योग्य? असाही मुद्दा उपस्थित करत प्रवेशासाठी नव्यानं तयार करण्यात आलेली पर्सेंटाईल पद्धती आणि त्यातील तफावतीवर आठवड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचं आदेशही हायकोर्टानं एनटीएला दिले आहेत.


साल 2019 च्या पर्सेंटाईल यादीचा दाखला देताना तेव्हाच्या पर्सेंटाईल यादीनुसार, खुल्या प्रवर्गासाठी महाराष्ट्रात (Maharashtra) 418 पर्सेटाईल मिळवलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र होते. मात्र त्याचवेळी गोव्यात प्रवेशासाठी 365 पर्सेंटाईल मिळवलेले विद्यार्थी पात्र होते. त्यामुळे  महाराष्ट्रातील विद्यार्थ्याच्या तुलनेत गोव्याच्या विद्यार्थ्याला पर्सेंटाईल पद्धतीचा लाभ अधिक होतो. यावर बोट ठेवत हायकोर्टानं या पर्सेंटाईल पद्धतीतील तफावतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.


याचिका नेमकी काय? 


एनटीएच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी (Engineering Admission of NTA) आता 50 ऐवजी 75 टक्के गुणांच्या पात्रता निकषाच्या निर्णयाला विरोध करत वकील अनुभा श्रीवास्तव सहाय यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून त्यांनी पात्रता निकष शिथिल करण्याची मागणीही केली आहे. याशिवाय प्रवेशासाठी पर्सेंटाईल पद्धती अनिवार्य करण्याच्या एनटीएच्या निर्णयालाही याचिकेतून आव्हान दिलेलं आहे. मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे यावर गुरूवारी सुनावणी झाली. ज्यात हा निकष नवा नसल्याचा दावा एनटीएच्यावतीने अॅड. रुई रॉड्रिग्स यांनी केला. तसेच अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण किंवा संबंधित परीक्षा मंडळाच्या अव्वल 20 पर्सेंटाईल मिळवणं अनिवार्य करण्यात आल्याचं एनटीएकडून  सांगण्यात आलं. परंतु, साल 2019 नंतर कोणत्याही मंडळांनी अव्वल 20 पर्सेंटाईलची यादीच प्रसिद्ध केली नसल्याचं याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शानास आणून दिलं. तसेच पूर्वीच्या 50 टक्के गुणांच्या पात्रता निकषाऐवजी 75 टक्के गुणांचा पात्रता गुण कशासाठी? असा सवाल उपस्थित केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mumbai Fake Vaccination : कांदिवलीतील बनावट कोविड-19 लसीकरण प्रकरणातील चार आरोपी डॉक्टरांना जामीन मंजूर