मुंबई : रिलायन्स समूहाचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी  यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेनं घेतली आहे. या संस्थेने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. मात्र गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, कदाचित एखादी दहशतवादी संस्था चर्चेत येण्यासाठी हे करत असेल. आतापर्यंत तपासात असा कोणताही पुरावा याबाबत सापडलेला नाही.


मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी एखादी दहशतवादी संघटना जबाबदारी घेते ते प्रसिद्ध होण्यासाठी करत आहे. दिल्लीतील दूतावासाबाहेर स्फोट प्रकरणातही असा दावा केला गेला होता. परंतु आतापर्यंत तपासात कोणताही पुरावा सापडला नाही. मुकेश अंबानी  यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणातील चौकशीतही कोणताच पुरवा सापडलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


आरोपी मुंबईबाहेर पळाले?


मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या काड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करणारे लोक कोण होते, याचा तपास मुंबई पोलीस घेत आहेत. मात्र पोलीस तपासात अद्याप कोणताही असा पुरावा सापडला नाही की तपास पुढे सरकू शकेल. पोलिसांना या कटात वापरल्या गेलेल्या इनोव्हा कारचे फुटेज सापडले असून आरोपी टोल नाक्यांवरून मुंबईबाहेर गेले असल्याचं यातून दिसत आहे.


शुक्रवारी (26 फेब्रुवारी) संध्याकाळी दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात जिलेटिनच्या काड्यांनी सुसज्ज स्कॉर्पिओ कार सापडली होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचा बंगला अँटिलियापासून अवघ्या 600 मीटर अंतरावर ही कार पार्क केली होती.



अंबानी कुटुंबाला पत्राद्वारे धमकी


मुकेश अंबानींच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं आणि धमकीचं पत्र आढळून आल्यानं खळबळ उडाली. चिठ्ठीत लिहिलं की, "नीता भाभी आणि मुकेश भैया ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या." घटनास्थळी सापडलेली स्कॉर्पियो कार ही काही दिवसांपूर्वीच चोरीला गेली होती. याबाबत पोलिसातही तक्रार करण्यात आली होती.





संबंधित बातम्या

Mukesh Ambani यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार, गाडीत बनावट नंबर प्लेट, अंबानींचा दुश्मन कोण?





Tags