In Pics : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं कशी आली? 'त्या' गाडीत आढळल्या बनावट नंबर प्लेट्स,
मुंबई पोलिसांचे दहा पथकं संपर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन पथकं परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करत आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारमध्ये जिलेटिनच्या 25 कांड्या असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्रालयाला संबंधित प्रकाराची माहिती देण्यात आली आहे.
मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर पार्क करण्यात आलेल्या कार मध्ये स्फोटके सापडली आहेत.या मुळे मुंबई हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे निवासस्थान हे पेडर रोडवर आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. दरम्यान काल मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे.
या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे.
. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला
अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचं समोर आलं आहे. घराबाहेर स्कॉर्पिओ पार्क करतानाचे सीसीटीव्ही फुटेज 'माझा' च्या हाती लागले आहे.
अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओमध्ये ४ नंबर प्लेट आढळून आल्या आहेत.
त्या नंबर प्लेट एबीपी माझाच्या हाती लागल्या आहेत.
स्फोटकं आणि पत्राबरोबरच स्कॉर्पिओमध्ये वाहनांच्या बनावट नंबर प्लेट देखील आढळून आल्या होत्या.
मुकेश अंबानींच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं आणि धमकीचं पत्र आढळून आल्यानं गल्लीपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -