एक्स्प्लोर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही आरटीआय प्रकरणांत वैयक्तिकरित्या हजर राहणं सक्तीचं?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेला आरटीआय प्रकरणांवरील सुनावणी ऑनलाईन घेण्यास काय हरकत?, हायकोर्टाचा सवाल; तर मुंबईतील सर्व पालिकेच्या वॉर्डात ऑनलाईन उपक्रम सुरू करण्याबाबत अहवाल सादर करण्याचे बीएमसीला निर्देश

मुंबई : कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांना स्वत: उपस्थित राहणं सहज शक्य होत नाही. त्यामुळे आरटीआय अंतर्गत दाखल झालेल्या सर्व अपिलांवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन द्यायला काय हरकत आहे?, असा सवाल करत मुंबई महानगरपालिकेनं यासाठी स्वतंत्र उपाययोजना आखावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. मुंबई महापालिका प्रशासनानं एका याचिकाकर्त्याला आरटीआय अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अपिलावरील पहिल्या सुनावणीसाठी वैयक्तिक हजर राहून युक्तिवाद करण्यास सांगितले. त्याविरोधात त्यानं अॅड. मयूर फरिया यांच्यामार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमू्र्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीच्या संबंधित वॉर्ड कार्यालयापर्यंत प्रवास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे याची ऑनलाईन सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली. मात्र 'ए' प्रभागात दाखल केलेल्या या अपीलासंदर्भात कार्यकारी अभियंतांनी सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचा आग्रह धरत असल्याचे अॅड. मयूर फरिया यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर या अपीलसाठी 'ए' प्रभाग कार्यालयाकडून व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) सुविधा देण्यात येईल. अशी बाजू पालिकेच्यावतीने अॅड. यमुना पारेख यांनी मांडली. मात्र, ही सुविधा केवळ याच अपील पुरती मर्यादित न ठेवता ती सर्वांनाच देण्यात यावी. कारण, याचिकाकर्त्याने दाखल केलेली ही जनहित याचिका केवळ त्यांच्याच पुरती मर्यादित नसून प्रत्येकापर्यंत विस्तारलेली असल्याचं खंडपीठानं यावेळी नमूद केलं. त्यामुळे आरटीआय अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अपिलांसाठी व्हिसीची सुविधा सर्व वॉर्ड कार्यालयांना देण्याबाबत पालिका प्रशासनाने ठोस योजना आखून पुढील दहा दिवसात ही सोय उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा असे निर्देश देत हायकोर्टानं सुनावणी 14 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Embed widget