एक्स्प्लोर

ईश्वरचिठ्ठी वाद : महापौरनिवडीसाठी कोर्टाच्या निर्णयाचा शिवसेनेला फायदा नाहीच

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत लॉटरी पद्धतीने झालेला पराभव मान्य नसल्यानं शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर यांनी कोर्टात धाव घेतली होती. फेरमतमोजणीची मागणी करत दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर 20 मार्चला सुनावणी होणार आहे. त्यामुळे 8 मार्चला होणाऱ्या महापौर निवडीत शिवसेनेला कोर्टाच्या निकालाचा फायदा होणार नाही. मुंबई महापालिकेच्या मतमोजणीवेळी शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर आणि भाजपच्या अतुल शहा यांना समसमान मतं पडली होती. मात्र ईश्वरचिठ्ठी टाकून निर्णय घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी अतुल शहांना विजयी घोषित केलं होतं. टेंडर वोटिंगची जी मते आहेत त्यांची मोजणी केल्यास विजय हा आमचाच आहे, त्यामुळे टेंडर वोट मोजणीचे आदेश द्यावेत, अशी याचिका सुरेंद्र बागलकर यांनी मुंबईतील लघुवाद न्यायालयात दाखल केली आहे. या निवडणूकीत पाच टेंडर वोट आहेत. ते न्यायालयासमोर उघडण्याची तरतुद आहे. या टेंडर वोटच्या आधारे निवडणुकीचा निकाल पुन्हा घोषित करण्यात यावा अशी मागणी कोर्टासमोर बागलकरांच्या वकिलांनी ठेवली आहे. मात्र, जरी टेंडर वोटच्या मोजणीनंतर निकाल बागलकरांच्या बाजूनं झुकला, तरी महापौर निवडणूकीसाठी त्याचा फायदा शिवसेनेला होणार नाही. कारण महापौर निवडणूक ही 8 मार्चला आहे तर, टेंडर वोट संदर्भातली न्यायालयाची पहिली सुनावणी ही 20 मार्चला होणार आहे. दरम्यान या याचिकेत सुरेंद्र बागलकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी, 222 प्रभागाचे रिटर्निंग अधिकारी, भाजपचे विजयी उमेदवार अतुल शहा आणि इतर उमेदवारांना प्रतिवादी बनवण्यात आलं आहे. मुंबईतील लघुवाद न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता बागलकर यांच्या बाबतीत न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काय आहे प्रकरण? 23 फेब्रुवारीला झालेल्या मुंबई महापालिकेच्या मतमोजणीत भाजपचे अतुल शहा आणि शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर यांना समान मतं पडली होती. त्यानंतर फेरमतमोजणीही करण्यात आली. मात्र फेरमतमोजणीनंतरही दोघांची मतं समान राहिल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्याठिकाणी शिवसेनेकडून संजय राऊत, अरविंद सावंत, तर भाजपकडून राज पुरोहित आणि मंगलप्रभात लोढा आदी नेते उपस्थित होते. ईश्वर चिठ्ठीचा निर्णय झाल्यावर दोन्ही उमेदवारांची नावं चिठ्ठीवर लिहून टाकण्यात आली. एका चिमुरडीला मंचावर बोलावून ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात अतुल शहा यांचं नाव विजयी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं. टेंडर मते म्हणजे काय??
  • बुथवरील उमेदवार प्रतिनिधीने एखाद्या मतदाराबाबत आक्षेप घेतला आणि त्या मतदाराकडे मतदान करण्यापुरते पुरावे असल्यास त्या मतदाराला मतपत्रिकेद्वारे मतदान करू दिले जाते.
  • म्हणजे त्याला ईव्हीएममध्ये बटण दाबून नव्हे तर स्वतंत्र मतपत्रिका दिली जाते.
  • यामध्ये  एकाच मतदाराच्या नावाने दुसरा मतदार आला तर त्याचेही मतदान होऊ शकते.
  • परंतु हे मतदान मतमोजणीवेळी न मोजता कोर्टात उघडले जाते.
  • प्रभाग क्रमांक 220 मध्ये अशी 5 मते आहेत. ही मते मोजण्यात यावीत, यासाठी सेनेचे सुरेंद्र बागलकर कोर्टाचे दार ठोठावणार आहेत.

संबंधित बातम्या :

ईश्वरचिठ्ठी टाकून झालेला निर्णय मान्य नाही, सुरेंद्र बागलकर कोर्टात

महत्त्वाच्या बातम्या

चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget