एक्स्प्लोर

मुंबईकरांच्या ताटात येणारं चिकन किती सुरक्षित?: हायकोर्ट

एका सेवाभावी संस्थेने मुंबईतील खाद्यपदार्थांवर होणाऱ्या कीटकनाशक फवारणीसंदर्भातील समस्येवर हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.

मुंबई : मुंबईकरांच्या ताटात येणारं चिकन कितपत सुरक्षित आहे? मुंबईत चिकन पुरवणाऱ्या पोल्ट्रीफार्ममध्ये कोंबड्यांचं योग्यप्रकारे लसीकरण होतं की नाही याची नियमित तपासणी होते का? असे सवाल उपस्थित करताच त्याची नकारार्थी उत्तर हायकोर्टात उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळाली. एका सेवाभावी संस्थेने मुंबईतील खाद्यपदार्थांवर होणाऱ्या कीटकनाशक फवारणीसंदर्भातील समस्येवर हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. सध्याच्या मॉल संस्कृतीत लोकं मॉलमधून चकाकती फळं, भाज्या आणि इतर खाद्यपदार्थ विकत घेणं पसंत करतात. मात्र मॉलमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी होते का? सर्व मॉल्समध्ये मोठमोठी शीतगृह बनवली जातात, जिथे लोक आपल्या शॉपिंग ट्रॉलीसह जाऊन हवी ती फ्रोजन मांसमच्छी विकत घेतात. पण या फ्रोझन फूडची एक्सपायरी डेट योग्य आहे की नाही? इथली इतर खाद्यपदार्थही खाण्यायोग्य आहेत का? जंकफूड हे लहान मुलांच्या खाण्यासाठी योग्य आहे का? त्याची तपासणी होते का? असे महत्त्वपूर्ण सवालही हायकोर्टाने उपस्थित केले. याबद्दल व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. तसंच राज्याच्या सूचना आणि प्रसारण खात्यातर्फे सार्वजिक ठिकाणं, थिएटर्स, मॉल्स इत्यादी ठिकाणी जाहिराती देण्याबाबत विचार करावा, असे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला देत 6 आठवड्यांत सविस्तर उत्तर देण्यासाठी वेळ दिला आहे. या सुनावणी दरम्यान यवतमाळमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिकांवर किटकनाशकांची फवारणी करण्याआधी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देता का? असा सवालही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला. यवतमाळमध्ये कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान 20 शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूचीही हायकोर्टाकडून दखल घेण्यात आली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातील नेत्यांच्या बैठकीत मोठा ट्विस्ट, भरलेले फॉर्म 4 तारखेपर्यंत मागे घेऊ नका, एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्याची सुत्रांची माहिती 
कोकणातील नेत्यांच्या बैठकीत मोठा ट्विस्ट, भरलेले फॉर्म 4 तारखेपर्यंत मागे घेऊ नका, एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्याची सुत्रांची माहिती 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget