Sachin Sawant: आयआरएस (IRS) अधिकारी सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी मल्याळम अभिनेत्री नव्या नायरची (Navya Nair) कोची (Kochi) येथे 15-20 वेळा भेट घेतली,असा आरोप ईडीने केला आहे.  विशेष न्यायालयासमोर सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, सावंत यांचा ड्रायव्हर समीर गबाजी नलावडे यांनी सांगितले की,  नायर ही सावंत यांची मैत्रीण आहे आणि ती त्याच निवासी इमारतीत राहत होती. ती सावंत यांच्याच इमारतीत राहायची. सावंत यांनी तिची 15-20 वेळा भेट घेतली आणि तिला सुमारे 1.75 लाख रुपयांची अँकलेटही भेट दिली.


ईडीनं जून महिन्यामध्ये सचिन सावंत यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक केली होती. आता ईडीनं  सावंत यांच्यावर काही आरोप केले आहेत. आरोपपत्रात सचिन सावंत यांचा ड्रायव्हर समीर गबाजी नलावडे याने सांगितले की, नव्या नायर ही सावंत यांची मैत्रीण आहे. ती सचिन सावंत यांच्याच इमारतीत राहायची. ती कोचीला गेल्यानंतर, सावंत यांनी तिची 15-20 वेळा तिची भेट घेतली होती आणि तिला सुमारे 1,75,000 रुपये किंमतीचे सोन्याची अँकलेटही भेट म्हणून दिले.   


सावंत यांचा मित्र सागर हनुबंत ठाकूर याने सांगितले की, सचिन सावंत हे सानपाडा, नवी मुंबई येथे त्याच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नव्या नायरच्या अगदी जवळचा होते. ते काही आर्थिक व्यवहारात गुंतल्याचे ऐकले होते, असे सागरने सांगितले.  सागरने सावंत यांच्या वतीने एंडेव्हर कार खरेदी केली. ईडीच्या आरोपपत्रात सावंत यांचे सोशल मीडिया मित्र शशी प्रभा चौहान यांच्या वक्तव्याचाही समावेश आहे.


ईडीने सावंत यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, नव्या ही त्यांची  जवळची मैत्रिण आहे. पण त्यांनी तिला कोणतीही भेट दिले नव्हती. तिला भेटण्यासाठी आपण कोचीला गेलो नसल्याचेही सावंत यांनी सांगितले. गुरुवायूर आणि मन्नारसाला मंदिराला भेट देण्यासाठी सावंत यांनी कोचीला अनेकदा भेट दिली होती.पण त्याची पुष्टी करणारा कोणताही पुरावा त्याच्याकडे नाही.  


 सचिन सावंत (Former ED Employee Sachin Sawant) यांच्या मुंबईतील (Mumbai News) निवासस्थानावर ईडीकडून  छापा टाकण्यात आला होता.   500 कोटी रुपये बेकायदेशीररित्या वळवल्याच्या एका प्रकरणातील आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून सीबीआयनं (CBI) एफआयआर (FIR) दाखल केली. आणि याच प्रकरणी ईडीनं (ED) छापेमारी केली होती. छापेमारीनंतर ईडीनं जून महिन्यामध्ये सचिन सावंत यांना  अटकही केली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेले वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना 5 जुलैपर्यंत ED कोठडी