एक्स्प्लोर

जून 2018 पासून इंटीग्रेटेड कॉलेजवर पूर्णपणे बंदी

मुंबईसह राज्यातील इंटीग्रेटेड कॉलेजचा गोरखधंदा जून 2018 पासून कायमचा बंद करण्यात येईल आणि शिक्षणाचे बाजारीकरण थांबवण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. विद्यार्थ्यांनी पुढील वर्षापासून इंटीग्रेटेड कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ नये. जर अशा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर त्याची जबाबदारी सरकारवर राहणार नाही असेही त्यांनी जाहीर केले.

मुंबई : मुंबईसह राज्यातील इंटीग्रेटेड कॉलेजचा गोरखधंदा जून 2018 पासून कायमचा बंद करण्यात येईल आणि शिक्षणाचे बाजारीकरण थांबवण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात  केली. विद्यार्थ्यांनी पुढील वर्षापासून इंटीग्रेटेड कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ नये. जर अशा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर त्याची जबाबदारी सरकारवर राहणार नाही असेही त्यांनी जाहीर केले. विधानसभेत आशिष देशमुख यांनी इंटीग्रेटेड कॉलेजच्या गोरखधंद्याचा विषय उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे बोलत होते. ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये 96 टक्के इतके गुण मिळतात ते इंटीग्रेटेड कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. या कॉलेजमध्ये लाखो रुपये फी आकारण्यात येते. तेथे त्या विद्यार्थ्यांची 80 टक्के उपस्थिती लावण्यात येते आणि त्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये प्रवेश देण्यात येतो. यापुढे शिक्षणाचे हे बाजारीकरण बंद करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षीपासून इंटीग्रेटेड कॉलेजला प्रवेश घेण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कॉलेजमध्ये उपस्थितीत रहाणे बंधनकारक राहाणार आहे. विद्यार्थ्यांची ही उपस्थिती बायो मेट्रिक पद्धतीने करण्यात येणार आहे. अशा कॉलेजमधील विद्यार्थ्यांची उपस्थितीसुद्धा अनिवार्य होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जे विद्यार्थी पुढील वर्षीपासून इंटीग्रेटेड कॉलेजला प्रवेश घेतील आणि कॉलेजमध्ये अनुपस्थिती वाढल्यास अशा विद्यार्थ्यांना बारावीच्या परिक्षेला बसू देण्यात येणार नाही. याची कडक अंमलबजावणी सरकारमार्फत करण्यात येईल. जे विद्यार्थी अशा कॉलेजमध्ये प्रवेश घेतील त्याची जबाबदारी सरकारवर राहणार नाही. अशा इंटीग्रेटेड कॉलेजची यादी मार्च २०१८ मध्ये लावण्यात येईल, असेही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तावडे यांनी स्पष्ट केले. इंटिग्रेटेड कॉलेज म्हणजे काय? अकरावीच्या प्रवेशासाठी ज्या इंटेग्रेटेड कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात, त्या कॉलेजमध्ये त्यांना कॉलेजसोबत कोचिंग क्लासमध्येही प्रवेश घेता येतो. म्हणजे क्लास आणि कॉलेज हे एकच असतं किंवा काही कॉलेज कोणत्यातरी कोचिंग क्लाससोबत जोडलेले असतात. त्यामुळे या कॉलेजमुळे विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये पूर्ण वेळ देता येतो. कारण या कॉलेजला रोज हजर राहणे बंधनकारक नसतं.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्या FDA च्या कारवाईचा धडाका, मुंबईतील नायर रुग्णालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित, पुणे आणि अकोल्यातून अन्नसाठा जप्त
तुकाराम मुंढे यांच्या FDA च्या कारवाईचा धडाका, मुंबईतील नायर रुग्णालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित, पुणे अकोल्यातही कारवाई
दिशा सालियनचे वडील सतिश सालियन मातोश्रीवर जाणार, आदित्य ठाकरेंना मानहानीची नोटीस देणार
दिशा सालियनचे वडील सतिश सालियन मातोश्रीवर जाणार, आदित्य ठाकरेंना मानहानीची नोटीस देणार
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Embed widget