एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तिसऱ्या पतीपासून घटस्फोटासाठी इंद्राणी मुखर्जीचा अर्ज
मुंबई : पीटर मुखर्जीपासून घटस्फोटासाठी परवानगी मिळावी, यासाठी शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने कोर्टाचं दार ठोठावलं आहे. कोर्टानेही इंद्राणीला परवानगी दिली आहे.
इंद्राणी मुखर्जीचा हा तिसरा घटस्फोट असेल. याआधी तिचे दोन घटस्फोट झाले होते.
शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांच्यावर हत्येचा आरोप निश्चित करण्यात आला आहे.
शीना बोरा हत्या : सर्व आरोपींवर हत्येचा आरोप निश्चित
एप्रिल 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. या प्रकरणी गेल्या वर्षी पोलिसांनी इंद्राणी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय याला अटक केली. हे सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. इंद्राणी मुखर्जीने निर्दोष असल्याचा दावा केला आहे. मला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे. कुटुंबातील वादाचा बळी पडल्याचा दावा इंद्राणीने केला आहे. त्यामुळे पीटर मुखर्जीपासून घटस्फोटासाठी परवानगी मिळावी, यासाठी तिने अर्ज दाखल केला होता. इंद्राणीचा हा वैयक्तिक निर्णय आहे. ती हवं ते करु शकते, असं सांगत न्यायालयानेही तिला परवानगी दिली आहे. दरम्यान, इंद्राणी मुखर्जीने तिच्या मृत्यूपत्रात बदल करण्याचं ठरवलं आहे. संपत्तीमधील मोठा भाग भायखळा जेलमधील महिलांना तसंच इस्कॉनसारख्या संस्थांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित बातम्याशीना बोरा हत्या : इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांना अटक
जेलमध्ये इंद्राणीचा नवा उद्योग, भगवदगीतेचा इंग्रजी अनुवाद
आर्थर जेलमध्ये पीटर-भुजबळांची गट्टी, भुजबळांना मुखर्जींच्या घरचा डबा!
शीनाची हत्या पीटर-इंद्राणीनं लपवली?, ‘त्या’ फोनकॉल्समुळे नवा खुलासा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement