मुंबई: भारतीय नौदलात आज स्कॉर्पिअन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ''करंज'' दाखल होणार आहे.


करंज पाणबुडी 67.5 मिटर लांब, 12.3 मिटर उंच आणि 1565 टन वजनाची आहे. मुंबईतल्या माझगाव डॉक इथं स्वदेशी बनावटीच्या या करंज पाणबुडीचं जलावरण करण्यात आलं.

मेक इन इंडिया मोहिमेतंर्गत तयार झालेली ही पाणबुडी प्रत्येक प्रकारातल्या युद्धास उपयुक्त ठरेल, असं तिचं डिझाईन केलं आहे. विशेष म्हणजे करंज पाणबुडीतून शत्रूवर अचूक निशाणा साधणं सहज शक्य होणार आहे. त्यामुळे कलवरी, खांदेरी नंतर आता करंज पाणबुडीमुळे नौदलाची ताकद वाढणार आहे.

करंजच्या लाँचिंगवेळी नौदलाचे प्रमुख सुनील लांबा उपस्थित होते.

एक वर्षाच्या चाचणीनंतर आयएनएस करंज पाणबुडी नौदालाच्या ताफ्यात सामील होईल. या श्रेणीतील पहिली पाणबुडी INS कलवरी आणि दुसरी INS खंडेरी आहे. मेक इन इंडियाअंतर्गत 6 पाणबुड्या बनवण्यात येणार आहेत.