मुंबई : कोरोनाविरोधातील हे युद्ध आपण जिंकणार आहोत. आपण या संकटावर मात केल्यानंतर आपण विजयाची गुढी उभा करू, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. लढवय्यांचा महाराष्ट्र आहे. आज गुढी पाडवा आहे, या गुढीपाडव्याला महाराष्ट्र हा संपूर्ण भगवा होऊ जातो. मोठे उत्साहाचे वातावरण असते. पण आपल्याला हा गुढीपाडवा साजरा करायचा आहे, तो पण या कोरोनाच्या संकटावर मात करून. या संकटावर मात करून विजयाची गुढी उभी करून पाडवा साजरा करायचा आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना आपल्या घरातील एसी बंद करण्याचे देखील आवाहन केले.
ठाकरे यांनी सुरुवातीला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आहे. केवळ या वर्षाच्या नव्हे, तर संपूर्ण आयुष्य, सुखाचे, समाधानाचे निरोगी जावो, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, आज तुम्हाला निगेटीव्ह सांगायला आलेलो नाही. शुभेच्छा द्यायला आलो आहे. आता या संकटाच्या गांभीर्याबाबत कल्पना आली आहे. या संकटाकडे निगेटीव्ह बघत आलो आहे. या संकटाची तुलना मी सुरवातीलाचा जागतिक युद्धाशी केली आहे. युद्ध हे युद्ध असते. पण शत्रू आपल्याला माहित असतो. पण हा शत्रु दिसणारा नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो. घराच्या बाहेर पडू नका, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून एसी बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेही आम्ही सुरु केले आहे. वर्ष दोन वर्ष चला हवा येऊ द्या मध्येच आहे. खिडक्या उघड्या ठेवा. बाहेरची खेळती हवा येऊ द्या. मोकळ्या हवेत श्वास घेऊ या.
मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतो
मला अनेकजण विचारतात, तुम्ही घरी बसून काय करता. मी सांगतो, मी घरी मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतो. तुम्ही तुमच्या गृहमंत्र्यांचे ऐका. मला या निमित्ताने अनेक गोष्टी ऐकायला मिळते आहे. की कित्येकांच्या घरांत पहिल्यांदाच असा एकत्रित गुढी पाडवा साजरा होतो आहे. कुटुंब एकत्र आले आहे. असा एकत्र येण्याचा आनंद गमावला होतो. त्यामुळे आता घरीच अनेकजण वाचन, संगीत ऐकणे, छंद जोपासण्यात रमले आहे. जो आनंद आपण आजपर्यंत गमावला होतं. ती हौस म्हणून भागवून घेतो आहोत, असंही ते म्हणाले. पण दुसरीकडे काहीजण अशी आहेत. त्यांना त्यांच्या घराचा पत्ता देखील नाही. त्यांचे तळहातावर पोट आहे. त्यांच्या रोजीरोटीचे काय. असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्यांना मी सांगू इच्छितो की राज्यात अन्न-धान्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूची कमतरता भासणार नाही. धान्य, औषधे इतकेच काय पशूखाद्य, पाळीव प्राण्याच्या खाद्य यांची दुकानेही उघडी राहतील.
जसे मी पशूवैद्यकीय सेवांचे बोलतो आहेत. तसेच माणसांचे दवाखाने, वाड्या वस्त्यांवर दवाखाने आहेत. या सेवा कुठेही बंद केल्या नाहीत. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहतील. आज जरी शांतता असली तरी, पाडव्यादिवशी बहेर येऊ जकुणीही तिथे गर्दी करू नये, असे आवाहन पुन्हा एकदा करतो. जीवनावश्यक गोष्टींच्या आणि आवश्यक साधनांच्या मदतीसाठी कंपन्या, कंपन्यांचे मालक, उद्योगपती संपर्क करताहेत. कुणी हास्पिटल्स उपलब्ध करून देण्यासाठी पुढे आले आहेत. काही जण व्हेंटिलेटर्स, मास्क देऊ करत आहेत. पण त्या पलिकडे जाऊन मी कंपनी व्यवस्थापन, कारखानादार यांना आवाहन केले आहे, की काम नाही म्हणून माणुसकीचे न्यायाने किमान वेतन थांबवू नका. अन्यथा मोठे संकट येईल, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.
पुरवठा करणारी यंत्रणा, दुकाने, या यंत्रणेतील कर्मचारी वर्गाचे वाहतूक करता येणार आहे. शेतकरी वर्गाची कामे, जी कामे आवश्यकच कामे आहेत. अन्यथा पुढे जाऊन अन्न-धान्याचे संकट उभे राहू शकतो. त्यांनाही मनाई नाही. पण फक्त आणी फक्त जीवनावश्यक कामांसाठीच बाहेर पडा.
राज्यात अन्नधान्यचा मोठा साठा आहे. भाजीपाल्याची दुकाने बंद राहणार नाहीत. एकट्या दुकट्याने जा. आपल्यावर जबाबदारी आहे. घरात जे ज्येष्ठ आहेत त्यांची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपल्यावर म्हणजे वर्तमानकाळावर भविष्याची आणि ज्येष्ठांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
मुंबई शहर आणि उपनगर - 41
पिंपरी चिंचवड मनपा - 12
पुणे मनपा - 19
नवी मुंबई - 5
कल्याण - 5
नागपूर - 4
यवतमाळ - 4
सांगली - 4
अहमदनगर - 3
ठाणे - 3
सातारा - 2
पनवेल- 1
उल्हासनगर - 1
औरंगाबाद - 1
रत्नागिरी - 1
वसई-विरार - 1
Coronavirus | कोरोनावर मात करून विजयाची गुढी उभी करायचीय : मुख्यमंत्री ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Mar 2020 01:16 PM (IST)
राज्यात अन्न-धान्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूची कमतरता भासणार नाही. धान्य, औषधे इतकेच काय पशूखाद्य, पाळीव प्राण्याच्या खाद्य यांची दुकानेही उघडी राहतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -