एक्स्प्लोर

राज ठाकरेंना आघाडीत घेण्याच्या हालचालींना वेग, माणिकराव ठाकरे कृष्णकुंजवर

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधकांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच आघाडीला बळकटी देण्यासाठी आघाडीतील नेते मनसेला आघाडीत सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई : शरद पवारांनंतर आता काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधकांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच आघाडीला बळकटी देण्यासाठी आघाडीतील नेते मनसेला आघाडीत सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, माणिकराव ठाकरे आणि राज ठाकरेंमधील ही भेट राजकीय नसून सदिच्छा भेट असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी आघाडीत मनसेला घेण्यासाठी काँग्रेस अनुकूल नव्हती. त्यामुळे आता विधानसभेला घड्याळ (राष्ट्रवादी) आणि हाताला (काँग्रेस) मनसेच्या इंजिनाची साथ लाभणार का? हे पाहणे औत्सुकक्याचे ठरेल. माध्यमांच्या प्रतिनिधींनी माणिकराव ठाकरे यांना मनसेला आघाडीत घेण्याबाबत विचारले असता, माणिकराव ठाकरे म्हणाले की, दोन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेते मनसेच्या आघाडीतील प्रवेशाबाबत निर्णय घेतील. बुधवारी (काल) आघाडीतील नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास राजकीय चर्चा झाली. दरम्यान, काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीदेखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा, मनसेला आघाडीत एन्ट्री? | मुंबई | ABP Majha दोन दिवसात शरद पवार, राजू शेट्टी, माणिकराव ठाकरे या तीन नेत्यांसोबतच्या राज ठाकरेंच्या भेटींमुळे विधानसभेच्या तोंडावर मनसेला आघाडीत सामावून घेण्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. VIDEO | राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला | मुंबई | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅगची तपासणी होणार, लोकलमधून जाताना धारदार हत्यारे सोबत नेण्यावर निर्बंध, रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय 
मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅगची तपासणी होणार, लोकलमधून जाताना धारदार हत्यारे सोबत नेण्यावर निर्बंध, रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय 
Bombay High Court : 'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', सरकारच्या निर्णयांचा विरोध, घोषणाबाजीमुळं हद्दपार करता येणार नाही, मुंबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', राजकीय पक्षाच्या नेत्याची हद्दपारी रद्द, मुबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget